Crime News Saam tv
क्राईम

Crime News : सणासुदीच्या काळात युवकांचा भाेसकून खून, नांदेडसह तळेगाव पाेलीसांचा तपास सुरु

पाेलीस या घटनांचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी / दिलीप कांबळे

Crime News : नांदेड शहरात पैशाच्या देवाण - घेवणीवरून एका युवकाचा तलवारीने घाव घालून खून करण्यात आला आहे. नांदेड शहरातील सराफा भागात रात्री ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Maharashtra News)

केशव पवार आणि सागर यादव या दोघांमध्ये अनेक दिवसापासून जुना वाद सुरू होता. त्यातच पैशाच्या वादावरून सोमवारी रात्री या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी पर्यंत गेले.

सीसीटिव्ही कॅमेरात काही युवक हातात तलवारी घेऊन मारहाण करताना दिसत आहेत. या हाणामारीत सागर यादव याच्या डोक्यात तलवारीचे घाव मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मयत सागर यादव याचा भाऊ जखमी झाला आहे. या घटनेने मात्र नांदेड शहरतील सराफा भागात मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिक भयभीत झाले आहेत.

खूनाच्या घटनेने मावळ पुन्हा हादरले

पुणे मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबलेल्या तरुणाला तू इथे का थांबलास असं म्हणत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करत तरुणाच्या छातीत चाकू भोकसून हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृष्णा शेळके असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलिस अधिक तपास करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT