youth broked glass of 12 auto rickshaw at diva railway station  Saam Digital
क्राईम

Thane Crime News : दिवा रेल्वे स्थानकावरील 12 रिक्षांची युवकाकडून ताेडफाेड, युनियनची पाेलिसांत धाव

youth broked glass of 12 auto rickshaw at diva railway station : रिक्षा व्यावसायिकांनी संयम ठेवावा. लवकरच संशयितास अटक केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ पाेलिसांनी शिवशक्ती रिक्षा युनियनचे चालक व मालकांनी दिले.

विकास काटे

दिवा रेल्वे स्टेशन जवळ आज (गुरुवार) पहाटेच्या सहा सुमारास अज्ञात युवकाने 12 रिक्षा फोडल्याची घटना घडली आहे. संबंधितास रिक्षा चालकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने शस्त्र काढल्याने सर्वजण भयभीत झाले. त्याचा फायदा घेत युवकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

या घटनेनंतर शिवशक्ती रिक्षा युनियनचे चालक व मालक यांनी दिवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेबाबतची माहिती पाेलिसांना दिली. वरिष्ठ पाेलिसांनी तात्काळ काही कर्मचा-यांना युवकाच्या शाेधासाठी पाठविले.

शिवशक्ती रिक्षा युनियनचे चालक व मालक यांनी घटनेची तक्रार पाेलिसांत नाेंदवली आहे. पाेलिसांनी युवकाचा शाेध सुरु केला असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल. रिक्षा चालकांनी संयम ठेवावा असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांची मागणी; ओबीसी नेते आक्रमक

Shocking : पायात सँडल घातली, अन् घात झाला; विषारी सापाच्या दंशाने इंजिनीअरचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढणार? मसुद्याला अंतिम रूप देण्याच्या हालचाली

IBPS RRB Vacancy: सरकारी नोकरीची संधी! बँकेत लिपिक ते PO च्या १३,२१७ पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज

TET Exam : टीईटी गैरप्रकाराचा धसका; आता शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार, VIDEO

SCROLL FOR NEXT