Sadabhau Khot News : शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य काढून घेऊ नका अन्यथा आमच्याशी गाठ;सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा

sadabhau khot demands crop insurance and loan for farmers : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा, घोटाळयांची चौकशी करावी या मागण्यांसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्वाखाली सांगलीत आज चाबूक मोर्चा काढण्यात आला. त्यापूर्वी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला.
sadabhau khot demands crop insurance and loan for farmers
sadabhau khot demands crop insurance and loan for farmersSaam Digital
Published On

शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, त्यांचे स्वातंत्र्य काढून घेऊ नका अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत यांनी सरकराला दिला आहे. शेतक-यांच्या विविध समस्यांबाबत खाेत यांनी सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीकेची झाेड उठवली.

sadabhau khot demands crop insurance and loan for farmers
Ravikant Tupkar News: ...तर आमचा माेर्चा मुंबईच्या दिशेने, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

सदाभाऊ खोत म्हणाले राज्यात ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे तेथे पेरणी हंगाम सुरु झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले पाहिजे होते ते अद्याप मिळालेले नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी बॅंकेचा आढावा घ्यावा पीक कर्जाची स्थिती जाणून घ्यावी. कृषी विभागाने सतर्क राहत बाेगस बियाणे विक्री करणा-यांवर कारवाई करावी.

sadabhau khot demands crop insurance and loan for farmers
Kolhapur News : शौमिका महाडिकांचा प्रस्ताव सतेज पाटील स्विकारणार का?

खाेत पुढं बाेलताना म्हणाले कापसाचे नवे वाण एचटी बीटी बियाणांची लागवड केली तर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. राज्य सरकराने शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे. त्यांचे स्वातंत्र्य काढून घेऊ नका अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा खाेत यांनी दिला.

...तर मराठा समाजाला न्याय मिळेल

मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजासाठी काम करतात हे चांगले आहे. त्यांच्यामुळे राज्यात शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. या खासदारांकडून पत्र लिहून घ्या मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास आमचा पाठिंबा राहील. शरद पवार यांच्याकडूनही लिहून घ्यावे मग आम्ही समजू मराठा समाजासाठी जरांगे काम करत होते अन्यथा शरद पवार यांचे काम ते करत होते असा समज होईल असेही खाेत यांनी नमूद केेले.

Edited By : Siddharth Latkar

sadabhau khot demands crop insurance and loan for farmers
Vegetable Price Hike: भाज्यांसह लसूण, टाेमॅटाेच्या दराने गृहिणींचं बजेट काेलमडलं, जाणून घ्या भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com