Ratnagiri Bhagwati Fort Saam Tv News
क्राईम

Ratnagiri News : फेरफटका मारायला आली, नंतर तरुणीची भगवती किल्ल्यावरुन थेट समुद्रात उडी; रत्नागिरीत खळबळ

Ratnagiri Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती किल्ल्यावरून एका महिलेनं थेट समुद्रात उडी घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह समुद्रात दिसल्यानं देखील परिसरात खळबळ उडाली आहे.

Prashant Patil

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती किल्ल्यावरून एका महिलेनं थेट समुद्रात उडी घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह समुद्रात दिसल्यानं देखील परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील भगवती किल्ल्यावरून एका युवतीने आपलं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार आज रविवारी सकाळच्या सुमारास घडला आहे. या घटनेनं रत्नागिरी शहर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, ही युवती कोण आहे? हिचा अद्याप शोध लागलेला नाही.

रत्नागिरी पोलिसांनी या युवतीचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज केल्या असून या संदर्भातला वायरलेसही देण्यात आला आहे. या सगळ्या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरीचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी भेट दिली. या सगळ्याची माहिती घेत यासंदर्भात युवतीची ओळख पटवून तपासाचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. दरम्यान, भगवती किल्ल्याकडे वरील बाजूला जाताना एका व्यक्तीनं पाहिलं त्यानंतर ही तरुणी तिथे बसल्याचं देखील पाहिलं होतं, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

रत्नागिरी शहरात आज रविवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या सगळ्याची माहिती सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी शहर पोलिसांना एका पर्यटकाने दिली. या सगळ्या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळेला समुद्रात या युवतीचा मृतदेह दिसत होता, हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तातडीने पोलिसांनी एनडीआरएफ, माउंटेनरिंग टीम, फायरब्रिगेड, पथकाला पाचारण केलं. युवतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सलवार आणि कुर्ता या ड्रेसवर असलेली तरुणी अंदाजे २५ ते ३० वयाची आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT