Gadchiroli news Saam tv
क्राईम

Gadchiroli news: गडचिरोलीत रक्तरंजित थरार, नवऱ्याकडून बायकोवर चाकूने सपासप वार

Husband attacks wife: गडचिरोली जिल्ह्यात भरदिवसा पतीने पत्नीवर धारदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी महिलेवर उपचार सुरू असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामणपेठजवळ सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पतीने पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात कनिका दास उर्फ कनिका विश्वजीत मंडल या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी ब्रजकेश दास याने बामणपेठ जंगल मार्गावर पत्नी प्रवास करत असलेल्या दुचाकीचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने त्यांच्या दुचाकीला जाणूनबुजून धक्का दिला. धक्का बसल्यानंतर कनिका या रस्त्यावर कोसळल्या. त्या सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपीने धारदार चाकू काढून त्यांच्या हात, पाय, पोट आणि मानेवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला.

रूग्णालयात केलं दाखल

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवलं. तसंच जखमी महिलेला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना पुढील रुग्णालयात पाठवण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट

या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आष्टी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन म्हस्के करत आहेत.

दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे बामणपेठ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आरोपीला लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात धक्कादायक प्रकार! 12 लाखांची फूड टेस्टिंग मशीनच झाली गायब; आरोग्य विभागाचा गलथान कारभार?

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT