विरार-दादर लोकलमध्ये माथेफिरूने महिला डब्याजवळ धुडगूस घातला.
महिलांना शिवीगाळ व धमकी दिल्याने प्रवासी घाबरले.
रेल्वे हेल्पलाईनला कॉल करूनही महिलांना मदत मिळाली नाही.
या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकादरम्यान एक माथेफिरू नग्न अवस्थेत एसी लोकलमध्ये चढला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा पश्चिम रेल्वेवरील विरार ते दादर दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये संतापजनक प्रकार घडला आहे. एका माथेफिरूने रेल्वेच्या महिलांच्या डब्याजवळ येऊन धुडगूस घातला. तसेच महिलांना शिवीगाळ देखील केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार रेल्वेस्थानकातून दादरकडे येणाऱ्या लोकलमध्ये असलेल्या महिला डब्याच्या मागच्या माल डब्यामध्ये चढून एका माथेफिरूने उच्छाद केला. या माथेफिरूने माल डब्यात उभं राहून महिला डब्याच्या खिडकीला पकडून जोर जोरात ओरडू लागला. एका महिलेने ते बघताच आपल्या फोनमध्ये दृश्य कैद केले.
या व्हिडिओमध्ये हा मातेफिरू महिलांना शिवीगाळ घालत असल्याचं दिसलं. शिवाय रेल्वेच्या दरवाजाला लटकून स्टंट करताना दिसला. यावेळेस त्याने डब्याच्या खिडकीवर आणि पत्र्यावर लाथा बुक्क्या मारून अक्षरशः दहशत निर्माण केली होती. या घटनेने महिला घाबरल्या.
घाबरलेल्या महिलांनी मदतीसाठी रेल्वेच्या हेल्पलाइनवर फोन केला मात्र समोरून त्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही. त्यामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदर व्हिडिओ हा स्वरा भोसले यांनी चित्रित केला असून त्यांनी या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली आहे.
दरम्यान पोलीस या प्रकरणी ठोस पाऊल उचलणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच अशा प्रकारच्या घटना नेहमी महिला प्रवाशांबाबतच का घडतात ? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नेमका हा तरुण माथेफिरू आहे की नाही हे पोलीस तपासात उघड होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.