Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 72,00,000 रुपयांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी मालवणमध्ये मोठी कारवाई केली. पोलिसांनी 72,00,000 रुपयांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.
Mumbai Crime
Mumbai Crime News Saam tv
Published On
Summary

मालवणी पोलिसांनी २०५ किलो गांजा, पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त

मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ₹७२.३० लाख

आरोपी संतोष मोरे याला अटक करून अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल

तस्करी आंतरराज्यीय असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील मालवणी पोलिसांनी मोठ्या कारवाईतून तब्बल २०५ किलो गांजा, एक देशी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला. या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल ७२ लाख ३० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी संतोष मोरे याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीवर त्याच्यावर अंमली पदार्थ कायदा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime
शाळा सुटल्यानंतर दहावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग; एकट्यात गाठून अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने संपवलं, नागपुरात खळबळ

पोलिसांकडून ही कारवाई २५ जून रोजी संध्याकाळी करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. दिपक हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली 'गावदेवी मंदिर गेट' परिसरात संशयित व्यक्तीला पकडण्यात आलं. त्याच्या ताब्यातून २०५ किलो गांजा सापडला. पुढील तपासात या व्यक्तीकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आलं.

पोलिस तपासात हे प्रकरण आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीचे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी संतोष मोरे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ कायदा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे मालवणीत मोठ्या अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

Mumbai Crime
Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या लढ्यात अजित पवारांचा आमदार उतरला; सरकारला दिला घरचा आहेर, मोजक्या शब्दात केली पोलखोल

अंधेरी पश्चिमेत गटारावरील झाकणांची चोरी

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा परिसरात ऑटो रिक्षाचालकांनी अवघ्या काही मिनिटांत रस्त्यामधून जाणाऱ्या गटारावरील चार लोखंडी झाकणांची चोरी केल्याची घटना घडली. रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून जाताना रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने लोखंडी झाकण चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात घेत झाली आहे. वर्सोवा जयप्रकाश रोडवरील आराम नगर एक येथील बरिस्ता आणि हाकिम अलीमजवळील रस्त्यावरील झाकणे चोरीस गेली आहेत.

Mumbai Crime
Maratha Reservation : जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात सामील मराठा तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

बीएमसीच्या निकृष्ट डिझाइनमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र नागरिकांनी अशा चोरांवर बीएनएस अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या चोरीमुळे करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा नुकसान होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com