
आमदार अमोल मिटकरींनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा
सरकारने मूलभूत गरजांची व्यवस्था न केल्याबद्दल मिटकरींकडून नाराजी व्यक्त
मुंबईत जाऊन मनोज जरांगे यांना भेटणार असल्याचं मिटकरींनी सांगितलं
मिटकरींची लक्ष्मण हाकेंवरही जोरदार टीका
अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोला : आंदोलनस्थळी मराठा आंदोलकांच्या होत असलेल्या असुविधांबद्दल आमदार अमोल मिटकरींनी खंत व्यक्त केली. आंदोलनाची वेळ तीन महिने आधीच माहीत होती. तर सरकारने आंदोलकांच्या पाणी आणि इतर प्राथमिक गरजांची व्यवस्था करायला हवी होती, असं म्हणत आमदार मिटकरींचा सरकारला घरचा आहेर दिला. आंदोलकांवर मुंबईला यायची वेळ यायला नको होती, असेही त्यांनी म्हटलं.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. मुंबईला जाऊन लवकरच जरांगे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून पाठिंबा देणार असल्याचं मिटकरी म्हटलं. पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे मुख्य प्रवक्ते मांडतील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही कायम मराठा समाजाला न्याय देण्याची असल्याचं ते म्हणाले.
अमोल मिटकरी यांनी मराठा आंदोलकांच्या न मिळणाऱ्या असुविधांविषयी खंत व्यक्त केली. सरकारला मराठा समाजाच्या आंदोलनाची वेळ तीन महिने आधीच माहीत होती. त्यामुळे राज्य सरकारने आंदोलकांच्या पाणी आणि इतर प्राथमिक गरजांची व्यवस्था करायला हवी होती, असं म्हणत घरचा आहेर सरकारला आमदार मिटकरींनी दिला. यासोबतच आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळ यायला नको होती, असेही ते म्हणाले.
लक्ष्मण हाकेंवर टीका करताना आमदार मिटकरी यांनी हाके यांची परिस्थिती 'ना घरका ना घाटका' अशी झाली असल्याचा टोला लगावला. हाकेंना ओबीसींच्या बैठकीतून हाकलून दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार मिटकरींनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.