Wardha Breaking News: Saamtv
क्राईम

Wardha Crime: भयंकर! पोटच्या मुलाने मेहुण्याच्या मदतीने बापाला संपवलं, १५ दिवसानंतर हत्येचा उलगडा, धक्कादायक कारण समोर

Wardha Breaking News: मेहुण्याच्या मदतीने पोटच्या लेकानेच जन्मदात्या बापाला संपवल्याची घटना वर्ध्यामध्ये घडली. १५ दिवसानंतर या हत्येचा खुलासा झाला असून धक्कादायक कारण समोर आले आहे.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. १३ जून २०२४

पत्नीला वाईट नजरेने बघत असल्याच्या संशयातून मुलानेच मेहुण्याच्या मदतीने जन्मदात्या बापाला संपवल्याची धक्कादायक घटना वर्ध्यामध्ये घडली. १५ दिवसानंतर या हत्याकांडाचा खुलासा झाला असून आष्टी तालुक्यातील नमस्कारी गावात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील नसस्कारी गावचे बाबाराव महादेव पारिसे (वय, ५५) यांची २७ मे रोजी धारदार शस्त्राने वार करून तसेच डोक्यावर जबर प्रहार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. बाबाराव पारिसे हे रिचार्ज करण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. वर्धा नदीपात्रालगत गेलेल्या पायवाटीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

बाबाराव पारिसे यांचे मारेकरी कोण याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी घटनास्थळी भेट देत पाहणीही केली होती. मारेकऱ्याचा शोध लागत नसल्याने ते स्वतः या घटनेवर नजर ठेवून होते. स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेलसह तळेगाव पोलिसही मारेकऱ्याच्या शोधात होते.

अखेर १५ दिवस तपास केल्यानंतर मृतक बाबाराव यांचा मुलगा नागोराव बाबाराव पारिसे (वय, ३४) याने मेहुणा विलास आनंद केवदे (वय,२८ रा. नमस्कारी) याच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. बाबारावचा आधी गळा आवळून, नंतर चाकूने गळ्यावर वार केला. नंतर कुऱ्हाडीने डोक्यावर जबर प्रहार केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

मृतक बाबारावची मुलाच्या व मुलाच्या मेहुण्याच्या पत्नीवर वाईट नजर होती. याच कारणातून मृतक व मारेकऱ्यांमध्ये नेहमी खटके उडत होते. ज्यादिवशी हत्येचा कट रचला त्यादिवशी दुपारी याच कारणातून वाद झाला होता. अखेर संतप्त मुलाने साळ्याच्या मदतीने वडील बाबारावची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

SCROLL FOR NEXT