वसईमध्ये भररस्त्यात दिवसा ढवळ्या एका तरुणानं प्रेयसीची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित पाल याला अटक केली होती मात्र याच प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जी की, पोलिसांना आरोपी रोहित पालच्या कुटुंबियांचा शोध लावण्यात यश हाती आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसईत(Vasai) प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्यानं मोठा थकराप उडाला होता. आरती यादव असे मृत तरुणीचे नाव होते. या घटनेनंतर पोलिसांनी रोहित पाल याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु केली. या चौकशीत रोहिते तो अनाथ असल्याचे पोलिसांना सांगितले होते मात्र पोलिसांनी रोहितचे कुटुंबिय उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये असल्याचे समजले आहे.
अनाथ रोहितच्या कुटुंबियाचा लागला शोध...
वसई प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित पाल याच्या कुटुंबियांचा तपास लावण्यात पोलिसांना(Police) यश आले आहे. मात्र रोहितने तो अनाथ असल्याचे पोलिसांना सांगितले होते पंरतू पोलिस तपासात एक धक्कादायक बाब समोर आली की, १२ वर्षापूर्वी रोहित त्याच्या घरातून पळून गेला होता त्यानंतर त्याच्या पालकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार गाझियाबाद पोलिसांकडे दाखल केली होती.
जेव्हा वसई पोलिसांनी रोहित(Rohit) पालकडे चौकशी केली असता त्याने तो मुळचा हरियाचा असून तो त्याने त्याच्या बालपणी त्याच्या आई-वडिलांसह बहिणीला एका गमावले होते. त्यावेळी तो आठवीत शिकत होता. परंतू तेव्हा त्याला शाळा सोडून मामाच्या घरी वडोदरा राहायला जावे लागले. पहिल्यांदा २०१८ मध्ये मुंबईत राहला आला त्यानंतर तो नालासोपारा येथे राहण्यास गेला असे रोहितने पोलिसांना सांगितले होते.
नावाची अदलाबदल...
रोहितने आपले नाव रोहित यादव असल्याचे यापूर्वी पोलिसांना खोटे सांगितले.शिवाय त्याने चौकशीत त्याने आपले आडनाव पाल असून त्याचे आई-वडील आणि बहिणी जिंवत असल्याचे कबूल केले.
रोहित खरंच खोटे बोलत आहे की नाही याच्या तपासासाठी वालीव पोलिसांनी रोहित पालचा फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केला ज्याचा वापर पोलिस देशभरातील हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी करतात. यातून पोलिसांना अखेरीस गाझियाबाद पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला. ज्यांनी सांगितले की गाझियाबादमध्ये साधारण १२ वर्षांपूर्वी रोहित पाल नावाच्या मुलाची हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. जी तक्रार सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या आणि पत्नी तसेच मुलींसोबत राहणाऱ्या मुलाच्या वडिलांनी दाखल केली होती.
वालीव पोलिसांनी गाझियाबादमधील पोलिसांशी संपर्क साधून रोहितच्या पालकांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबईला येण्याची विनंती केली आहे. आरोपी रोहित घरातून पळून का गेला याचा अधिकचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे.
नेमके प्रकरण काय होते?
रोहिक पोल याने १८ जून रोजी तिच्या प्रेयसीची स्पॅनरने बेदम मारहाण करत हत्या केली होती. या हत्ये प्रकरणई पोलिसांनी रोहितला अटक करण्यात आली होती. रोहितने तिच्या प्रेयसीसी तिच्या घराबाहेर दुसऱ्या पुरुषासोबत पाहिले होते आणि ती आपली फसवणुक करत असल्याचा संशय होता या कारणाने त्याने ही हत्या केली होती. गेल्या आठवड्यात स्थानिक न्यायालयाने त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.