Vasai Crime News: माझ्या मुलीला मारलं... आता त्याचाही जीव पाहीजे, तरुणीच्या हत्येनंतर आईची संतप्त प्रतिक्रिया

Vasai Girl Killed By Boyfriend: प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू केला आहे.
Vasai Crime News: आरोपी माझ्या मुलीला त्रास देत होता पण..., वसईत तरुणीच्या हत्येनंतर वडिलांनी पोलिसांवरच केले गंभीर आरोप
Vasai Girl Killed By BoyfriendSaam Tv

महेंद्र वानखेडे, वसई

वसईमध्ये प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून तपास सुरू केला आहे. या घटनेवर मृत तरुणीच्या आई-वडिलांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलीचा जीव गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'आरोपी माझ्या मुलीला त्रास देत होता. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती पण त्यांनी दुर्लक्ष केले.', असा आरोप त्यांनी केला.

मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी रोहित आमच्या शेजारी राहत होता. माझ्या मुलीवर तो प्रेम करत होता. आमच्या मुलीला तो त्रास देत होता. १० दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यामध्ये रोहितविरोधात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी दोघांनाही समजावून घरी पाठवले. त्यानंतर आज ही घटना घडली. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज ही घटना घडली.' पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या मुलीला जीव गमवावा लागला असा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे.

Vasai Crime News: आरोपी माझ्या मुलीला त्रास देत होता पण..., वसईत तरुणीच्या हत्येनंतर वडिलांनी पोलिसांवरच केले गंभीर आरोप
Vasai Crime News : प्रेमाचा भयानक शेवट, प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; वसईतील थरारक घटनेचा VIDEO

तर मृत तरुणीचीआई निर्मल यादव यांनी सांगितले की, 'रोहित आणि आरती या दोघांचे नेहमी फोनवर बोलणं व्हायचं. रोहित लग्न करण्यासाठी तिच्या मागे लागला होता. आम्ही घर घे असं त्याला म्हणालो होतो. पण नंतर त्याने आरतीला मला घर घेणं शक्य नाही असे सांगून लग्न करू असे म्हणाला होता. १० दिवसांपूर्वी रोहितने आरतीचा मोबाईल फोडला होता. याप्रकरणी मी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही. पोलिस फक्त बोलले होते मी बघून घेतो. आरतीने चार दिवसांनंतर पोलिसांना फोन केला आणि माझा मोबाईल कधी मिळणार असे विचारले. तर पोलिसांनी तिला काय हजार पाचशे रुपयांसाठी तू बोलत आहे असे म्हणाले होते.'

Vasai Crime News: आरोपी माझ्या मुलीला त्रास देत होता पण..., वसईत तरुणीच्या हत्येनंतर वडिलांनी पोलिसांवरच केले गंभीर आरोप
VIDEO : तरुणीची माजी प्रियकरानं भररस्त्यात केली निर्घृण हत्या, VIDEO बघून महिला नेत्या हळहळल्या, संतापल्या

तसंच, 'रोहितने मोबाईल तोडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात काहीच कारवाई केली नव्हती. पोलिसांनी जर याप्रकरणी कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती. माझ्या मुलीचा जीव गेला आता त्याचाही जीव पाहिजे. माझी मुलगी नाही तर तो देखील नकोय. पोलिसांनी आम्ही केलेल्या तक्रारीवर लक्ष दिले असते तर आरतीचा जीव वाचला असता.', असे म्हणत आरतीच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

Vasai Crime News: आरोपी माझ्या मुलीला त्रास देत होता पण..., वसईत तरुणीच्या हत्येनंतर वडिलांनी पोलिसांवरच केले गंभीर आरोप
Mumbai Local Train News: नेव्हीमध्ये भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण! ट्रेनमधून पडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com