Vasai Crime News : प्रेमाचा भयानक शेवट, प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; वसईतील थरारक घटनेचा VIDEO

Vasai Boyfriend killed Girlfriend : प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईच्या पूर्व चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
प्रेमाचा भयानक शेवट, प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; वसईतील थरारक घटनेचा VIDEO
Vasai Boyfriend killed GirlfriendSaam TV

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही वसई

प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईच्या पूर्व चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या हत्याकांडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आरती यादव (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित यादव याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आरतीचे आरोपी रोहित यादव याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या दोन वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. आरती आपल्यासोबत बोलत नसल्याचा राग आरोपी रोहितच्या मनात होता.

रोहित हा आरतीची मनधरणी करत होता. मात्र, ती काही त्याच्यासोबत बोलायला तयार नव्हती. यावरून रोहितला राग अनावर झाला. आज मंगळवारी पहाटे त्याने आरतीचा पाठलाग केला आणि भररस्त्यात तिच्यावर लोखंडी पान्ह्याने सपासप वार केले.

धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा आरोपी रोहित हा आरतीवर वार करीत होता, तेव्हा रस्त्यावरील नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत होते. काहीजण मोबाइलमध्ये व्हिडीओ शुट करण्यास व्यस्त होते. कुणीही आरतीच्या मदतीला धावून गेले नाही.

प्रेमाचा भयानक शेवट, प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; वसईतील थरारक घटनेचा VIDEO
Rajasthan High Court News : मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वतःही नग्न होणं हा बलात्काराचा प्रयत्न नव्हे : हायकोर्ट

याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी रोहित हा आरतीच्या डोक्यात तसेच छातीत लोखंडी पान्ह्याने वार करत राहिला. या घटनेत आरतीला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आरतीच्या मृत्यूनंतर रोहित हा तिच्या मृतदेहाजवळ बसून जोरजोरात रडत होता.

दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या ऑनर किलिंगच्या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरतीचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

प्रेमाचा भयानक शेवट, प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; वसईतील थरारक घटनेचा VIDEO
Mumbai High Court : आधी प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार, नंतर जामिनालाही संमती; हायकोर्ट संतापलं!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com