VIDEO : तरुणीची माजी प्रियकरानं भररस्त्यात केली निर्घृण हत्या, VIDEO बघून महिला नेत्या हळहळल्या, संतापल्या

Rupali Chakankar and sushma Andhare Reacted On Vasai Case : भररस्त्यावर तरुणीची हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवरुन महिला राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
VIDEO : तरुणीची माजी प्रियकरानं भररस्त्यात केली निर्घृण हत्या, VIDEO बघून महिला नेत्या हळहळल्या, संतापल्या
Rupali Chakankar and sushma Andhare Reacted On Vasai CasSaam Tv

वसईच्या पूर्व चिंचपाडा परिसरात झालेल्या हत्याकांडावरून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय महिला नेत्यांनी हळहळ व्यक्त आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाणकर यांनी बघ्याची भूमिका घेण्याऱ्या लोकांवर संताप व्यक्त केलाय. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चाकणकर यांनी केलीय. पोलीस निरीक्षक नन्नवरे यांना कॉल करून आरोपीवर कठोर करण्याचे आदेश दिलेत, अशी माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिलीय.

वसईच्या पूर्व चिंचपाडा येथे एका तरुणीची हत्या झाल्याची घटना घडलीय. ब्रेकअप केल्यामुळे तरुणाने तरुणीची हत्या केली. तरुणीचे नाव आरती आहे. आरती आणि आरोपी रोहित यादव याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या दोन वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. आरती आपल्यासोबत बोलत नसल्याचा राग आरोपी रोहितच्या मनात होता, त्या रागातून त्याने आरती हत्या केली.

हत्याकांडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आरती यादव (वय २०) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित यादव याला अटक केली आहे. रोहित ज्यावेळी आरतीवर हल्ला करत होता, त्यावेळी तेथे अनेकांनी बघ्यांची भूमिका घेतली होती. त्यावरुन संताप व्यक्त केला जात आहेत. महिला राजकीय नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.

वसई येथील घडलेली घटना अतिशय हिंसक आहे. भररस्त्यात अशी घटना घडते ही चिंताजनक आहे. अनेकांनी बघायची भूमिका घेतली. याप्रकरणी आरोपीला कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. पोलीस निरीक्षक नन्नवरे यांना कॉल करून आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिले आहे. तर आरोपीवर कडक कारवाई होईपर्यंत राज्य महिला आयोग लक्ष घालेल, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्यात.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे

वसईत झालेली तरुणी हत्या काळजाचा थरकाप उडवणारी आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे तरुणीची भर रस्त्यात हत्या होते आणि लोक बघत राहतात. हे चित्र विदारक आहे. कायद्याचा बडगा हा अनेकदा चोर सोडून संन्याशाला फाशी देणाऱ्याच्या माथी पडतो. मदत करायला आलेल्या माणसांना पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील का हे वाटतं.

त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये लोक पुढे येऊन मदत करत नाहीत. आजही त्या मुलीची हत्या होत असताना त्या मुलीला कुणी मदत केली नाही. महाराष्ट्राच्या राजधानी जवळ इतकी गंभीर घटना घडणं हे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारं असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

VIDEO : तरुणीची माजी प्रियकरानं भररस्त्यात केली निर्घृण हत्या, VIDEO बघून महिला नेत्या हळहळल्या, संतापल्या
Vasai Crime News : प्रेमाचा भयानक शेवट, प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; वसईतील थरारक घटनेचा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com