Maharashtra Politics: संजय गायकवाड यांच्या भुजबळांवरील टीकेनंतर अजित पवार गट आक्रमक; रुपाली चाकणकर संतापल्या

NCP Rupali Chakankar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना 'समजेल' अशा भाषेत समज द्यावी, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
NCP Rupali Chakankar slams MLA Sanjay Gaikwad
NCP Rupali Chakankar slams MLA Sanjay GaikwadSaam TV
Published On

NCP Rupali Chakankar on MLA Sanjay Gaikwad

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना 'समजेल' अशा भाषेत समज द्यावी, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NCP Rupali Chakankar slams MLA Sanjay Gaikwad
Samruddhi Mahamarg News: चालकाचा ताबा सुटला अन् घात झाला; समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात

संजय गायकवाड यांनी मा.ना.भुजबळसाहेब यांच्याबद्दल जे अश्लाघ्य व उर्मट वक्तव्य केले आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. त्यांच्या सातत्याच्या अशा वक्तव्यांनी बुद्धीहीन वैचारिकतेचे प्रदर्शन मांडले आहे, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी आमदार संजय गायकवाड (Mla Sanjay Gaikwad) यांच्यावर केली.

आमदार गायकवाड यांच्या बुद्धीची कीव येते. असे लोकप्रतिनिधी सभागृहात असणे दुर्दैवच म्हणावे लागेल.तरी मुख्यमंत्री महोदयांनी संजय गायकवाड यांना 'समजेल'अशा भाषेत समज द्यावी, असं देखील चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

संजय गायकवाड काय म्हणाले होते?

मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अध्यादेश काढत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या. यावरून ओबीसी नेते आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारला आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.

यावर शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, असे विधान आमदार गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या विधानावरून आता अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

NCP Rupali Chakankar slams MLA Sanjay Gaikwad
Weather Forecast: सावधान! येत्या २४ तासांत गारपीटीचा तडाखा बसणार; कोणकोणत्या भागांना झोडपणार? वाचा वेदर रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com