Samruddhi Mahamarg News: चालकाचा ताबा सुटला अन् घात झाला; समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
Samruddhi Mahamarg Accident News Today
Samruddhi Mahamarg Accident News Today Saam TV
Published On

Samruddhi Mahamarg Accident News Today

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरच उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samruddhi Mahamarg Accident News Today
Weather Forecast: सावधान! येत्या २४ तासांत गारपीटीचा तडाखा बसणार; कोणकोणत्या भागांना झोडपणार? वाचा वेदर रिपोर्ट

जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने जात होती. (Latest Marathi News)

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील डोनद लोकेशन १७३ जवळ बस आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस महामार्गावरच (Samruddhi Mahamarg) उलटली. हा अपघात इतका भीषण होता, की बसचा समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला.

या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जखमींपैकी ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. समोरून जात असलेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळेच हा अपघात झाला अशी प्राथामिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Samruddhi Mahamarg Accident News Today
Daily Horoscope: बुधाच्या मकर राशीतील संक्रमणाने ५ राशींचं बदलणार भाग्य; आयुष्याला मिळणार कलाटणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com