vasai news Saam tv
क्राईम

Vasai Crime : धक्कादायक! वसईत दोन वयोवृद्धांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

Vasai Crime news in marathi : वसईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत दोन वयोवृद्धांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे,वसई

vasai Crime News :

वसईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत दोन वयोवृद्धांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

वसई पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिल्वेस्टर परेरा हे राहतात . ते १७ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. त्याचवेळी परेरा यांच्या भाावाच्या घराबाहेर २ अनोळखी मुले आणि १ अनोळखी महिला आपपसात भांडत होत्या. त्यामुळे सिल्वेस्टर परेरा यांचे भाऊ त्यांना समजविण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी तिघांना त्यांना मारहाण केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'तू आमच्यातील भांडण सोडवणारा कोण? तुला आता जीवे मारतो, असं बोलून तिघांना सिल्वेस्टर आणि त्यांच्या भावांना मारहाण केली. त्यांना जिवे मारण्याच्या दृष्टीने त्यांच्या डोक्यात जोराने वारंवार दगडाने मारले. तसेच डोळ्यास हत्याराने मारून जखमी केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

वसईतील वयोवृद्धांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदार तसेच तपास अधिकारी यांचे ३ पथक तयार करून तपास सुरु केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानंतर तिन्ही आरोपींना अर्नाळ्याच्या नंदाखाल येथून अटक केले आहे.

पुण्यात पोलिसांची ड्रग्जची मोठी कारवाई

पुणे पोलिसांच्या इतिहासातील ड्रग्जची सर्वात मोठी कारवाई केली आहे. १८ फेब्रुवारीला पुण्यातील सोमवार पेठेत काही ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहेत.  त्यानंतर तपासात एक किलो मेफेड्रॉन जप्त केले आहेत. या प्रकरणी वैभव माने,  हैदर शेख,अजय करोसीया या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी तिघांकडे चौकशी केल्यावर पुण्यातील विश्रांतवाडी, मीठाच्या पाकिटांमधे दडवलेले ५५ किलो मेफेड्रॉन जप्त केले आहेत.  

पोलिसांना थेट मेफेड्रॉन तयार करण्याचा कारखाना सापडला. पोलिसांनी एकूण ६०० किलो मेफेड्रॉन जप्त केले आहेत. या कंपनीतून दिल्लीला आणि सांगलीला मेफेड्रॉन पाठवल्याचे समोर आले आहे. सांगलीतून कुपवाडमधून १४० किलो मेफेड्रॉन पोलिसांकडून जप्त केले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

SCROLL FOR NEXT