Vasai Crime News Vasai Crime News
क्राईम

Vasai Crime News: वसई हादरली! २५ सेकंदात तब्बल १२ वार, जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीला त्याने भररस्त्यात संपवलं

Vasai Crime News: बातमी आहे वसईतील तरुणीच्या हत्येची. हत्येचे 25 सेकंद 12 वार. षंढ बघे आणि थंड पोलिसांनी घेतलेल्या आरतीच्या बळीची.

Vinod Patil

वसईमध्ये भररस्त्यात दिवसा ढवळ्या एका तरूणानं प्रेयसीची हत्या केल्यानं मोठा थरकाप उडालाय. आरती यादव नेहमीप्रमाणे कामावर जायला निघाली. तिच्या मागे मागे रोहित यादवही जात होता. रस्त्यातच दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरती उशीर होत असल्यानं पुढे निघाली.

मात्र संतापलेला रोहितनं आपल्या बॅगेतून लोखंडी पाना बाहेर काढला आणि थेट आरतीच्या डोक्यात घातला. हा प्रहार एवढा भयानक होता की आरती थेट जमिनीवर कोसळली. निर्दयी रोहितचं मन एवढ्यावर भरलं नाही. त्यानं निपचित पडलेल्या आरतीच्या डोक्यात 25 सेकंदात लोखंडी पान्यानं तब्बल 12 वार केले आणि आरतीला संपवलं.

हे थरकाप उडवणारं कृत्य वसईच्या चिंचपाडा परिसरातल्या रस्त्यावर घडत होतं एखा तरूणानं नराधम रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या मदतीला कुणीही आलं नाही. आजूबाजूला जमलेले अनेक जण केवळ थंड बसून हे सगळं पाहात होते. ह्या बघ्यांच्या सर्व भावना आणि संवेदना मेल्या होत्या की काय.? कारण रोहितनं आरतीचा मुडदा पाडला. तर ह्या बघ्यांनीही माणुसकीचा मुदडा पाडला.

आरती आणि रोहितमध्ये सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादातून रोहितनं आरतीचा मोबाईल फोडला होता. रोहितविरोधात आरतीसह तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी मात्र रोहितवर थातूर मातूर कारवाई करून त्याला सोडून दिल्यामुळेच आरतीचा जीव गेल्याचा आरोप आई-वडिलांनी केलाय.

रोहितपासून आरतीच्या जीवाला धोका असल्याचंही पोलिसांना सांगितल्याचा दावा आईवडिलांनी केलाय. आई-वडिलांनी केलेल्या आरोपांमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आरती जर पोलिसांची मुलगी असती तर रोहितवर अशीच थातूरमातूर कारवाई करून सोडून दिले असते का? तुमच्या आमच्या मुलीवर भर रस्त्यात कुणी असेच वार करत असतं तर तुम्हीही षंढासारखं असं थंडपणे बघत बसले असते का? असे अनेक सवाल पोलीस यंत्रणेवर आणि तुमच्या-आमच्यावर आरतीच्या हत्येमुळे निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT