Uttarakhand Nurse Rape Case Saam TV
क्राईम

Crime News : रुग्णालयातून घरी परतणाऱ्या नर्सची बलात्कार करून हत्या; भयानक घटनेनं उत्तराखंड हादरलं

Uttarakhand Nurse Rape Case : रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिला नर्सवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.

Satish Daud

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तराखंडमध्येही अशाच प्रकारची संतापजनक घटना घटना घडली. रुग्णालयातून घरी परतणाऱ्या महिला नर्सवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.

महिला डॉक्टरनंतर आता परिचारिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. धरेंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. धरेंद्र हा मूळ बरेलीचा रहिवासी असून तो उधमिंहनगरमध्ये मजुरीच्या कामासाठी येत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर परिचारिका उत्तराखंडच्या (Uttarakhand) उधमसिंहनगर जिल्ह्यात एका रुग्णालयात कामाला होती. 31 जुलैला परिसचारिका नेहमीप्रमाणे कामावर गेली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिच्या बहिणीने रुग्णालयात फोन करून विचारले असता, परिचारिका काम आटोपून घराकडे निघाली होती, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, परिचारिकेच्या बहिणीने तातडीने पोलिसांत धाव घेऊन हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी (Police) या परिचारिकेची शोधाशोध घेतली असता ८ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह एका रिकाम्या जागेवर आढळून आला. पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एक मोठा पुरावा सापडला.

रुग्णालयातील काम आटोपून घरी निघालेल्या परिचारिकेचा धर्मेंद्र कुमार हा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी त्लाया शोधून कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र कुमारने 31 जुलैच्या रात्री नर्सला घरी जाताना बघितलं.

त्याने तिला वाटेतच अडवून तोंड दाबून एका निर्जनस्थळी नेलं. तिथे आरोपीने नर्सवर अतिशय अमानुषपणे बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने नर्सची हत्या केली. तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्समधील पैसे घेऊन पळ काढला. आरोपी धर्मेंद्र कुमार हा एक ड्रग अॅडिक्ट आहे. त्याला ही नर्स कोण हे माहीतही नव्हतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT