Uttrakhand Haridwar Crime News Saam tv
क्राईम

Shocking : भयंकर! एकट्यात गाठलं, जीवे मारण्याची धमकी दिली; १४ वर्षीय मुलीवर प्रशिक्षकाकडून बलात्कार

Uttrakhand Haridwar Crime News : हरिद्वारमध्ये तिरंदाजी प्रशिक्षकाकडून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • हरिद्वारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

  • प्रशिक्षकाकडून तीन महिने छळ

  • कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर उघड झाला प्रकार

  • पोलिसांकडून आरोपी अटक, तपास सुरू

Uttrakhand Haridwar Rape News उत्तराखंडच्या हरिद्वारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रशिक्षकाने १४ वर्षांच्या मुलीवर तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचा उघडकीस आला आहे. इतक्यावरच न थांबता या नराधमाने सलग तीन महिने मुलीवर अत्याचार केले. या प्रकारामुळे आता पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील कंखल भागातील एका नामांकित शाळेत पीडित मुलगी शिकत होती. याच शाळेत ती तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत होती. २०२५ साली ऑक्टोबर महिन्यात पीडित मुलीला तिरंदाजी शिकवणाऱ्या प्रशिक्षकाने एकटीला बोलावून धमकावले. तसेच तिच्यावर बलात्कार केला. शिक्षकाच्या घाणेरड्या कृत्याने पीडित मुलगी बिथरली होती.

नराधम आरोपीने पीडित मुलीवर सलग तीन महिने अत्याचार केला. मुलीच्या वागण्या बोलण्यातील फरक जाणवल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली. यावेळेस मुलीने तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. पीडित मुलीच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सांगितले की, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस सर्व बाबींचा कसून तपास करत आहेत. पोलीस आरोपी प्रशिक्षकाच्या ठिकाणाचा शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: कार आणि ट्रकचा भीषण अपघात; ३ वरिष्ठ पोलिसांसह चौघांचा जागीच मृत्यू, महामार्गावर रक्ताचा सडा

Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे स्थानकात ९ तासांचा मेगा ब्लॉक; दौंडकडे जाणाऱ्या अनेक ट्रेन रद्द

Friday Horoscope: या राशींची प्रेमामध्ये फसवणूकीची शक्यता आहे, वाचा तुमचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणास ३० जूनपर्यंत मुदतवाढ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Traffic Update: सावधान! पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जड वाहनांना नो एन्ट्री, जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT