Summary -
लखनऊमध्ये तरुणीची घरात घुसून निर्घृण हत्या
लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडने संपवलं
अधिक रक्तस्राव झाल्याने तरुणीचा जागीच मृत्यू
पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत केली अटक
उत्तर प्रदेशमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. लग्नाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या बॉयफ्रेंडने तरुणीची निर्घृण हत्या केली. लखनऊच्या मोहनलालगंजमधील धर्मावतखेडा गावात रविवारी दुपारी ही घटना घडली. तरुणाने गर्लफ्रेंडच्या घरात घुसून तिची धारधार शस्त्राने हत्या केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला आटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मावतखेडा गावात राहणाऱ्या पूनम रावत एका खासगी रुग्णालयात काम करतात. रविवारी दुपारी त्या घरात काम करत होत्या. त्यांची मोठी मुलगी प्रियांशी (१९ वर्षे) आणि छोटी मुलगी महक घरामध्येच होत्या. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बीबीडी लोनापूर येथे राहणारा आलोक रावत त्यांच्या घरी आला. त्याने महकला प्रियांशी कुठे आहे असे विचारले. त्यानंतर तो घराच्या पहिल्या मजल्यावर गेला. किचनमध्ये असलेल्या प्रियांशीसोबत त्यांचा वाद झाला.
रागाच्या भरात आलोकने सोबत आणलेल्या कटरने प्रियांशीचा गळा चिरला. त्यानंतर त्याने प्रियांशीवर सपासप वार देखील केले. गळ्याची नस कपल्यामुळे प्रियांशी गंभीर जखमी झाली. तशीच जोरजोरात ओरडत ती पायऱ्यांवरून उतरत खाली आली. अधिक रक्तस्राव झाल्यामुळे प्रियांशीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी आलोक घरातून बाहेर गेला आणि बुलेटवरून पळून गेला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि प्रियांशीचा जीव गेला. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला
प्रियांशीच्या आईने सांगितले की, दोन वर्षापूर्वी एका नातेवाईकाच्या लग्नामध्ये प्रियांशी आणि आलोक यांचा पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांशी बोलू लागले. काही दिवसांनंतर आलोकने प्रियांशीच्या घरी लग्नाची मागणी केली. प्रियांशीच्या घरचे तयार देखील झाले. त्यानंतर आलोकचे प्रियांशीच्या घरी येणं-जाणं सुरूझाले. पण आलोकने अनकेदा दारूच्या नशेत प्रियांशीला मारहाण केली होत. त्यामुळे प्रियांशीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे आलोक नाराज होता. तो प्रियांशीवर लग्नासाठी दबाव टाकत होता.
३ वर्षांपूर्वी प्रियांशीच्या वडिलांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. तिची आई पूनम रुग्णालयात काम करून घर चालवत होती. प्रियांशी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. प्रियांशीच्या हत्येमुळे तिच्या आईला मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रियांशीचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी त्यांनी आरोपी आलोकविरोधात गुन्हा दाखल करत त्याला काही तासांत अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.