Mumbai Crime: 'ते' फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी, बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

Goregaon Police: मुंबईतल्या गोरेगावमध्ये १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून मासिक तणावात येत या मुलीने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime: 'ते' फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी,  बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
Mumbai CrimeSaam Tv
Published On

बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून मुंबईमध्ये एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगावमध्ये राहत्या घरी या मुलीने गळफास घेत आयुष्य संपवलं. एआयचा वापर करून मॉर्फ फोटो तयार करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी या मुलीला दिली जात होती. बॉयफ्रेंडच्या या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच परिसरात राहत होते. ही तरुणी ऑगस्ट महिन्यामध्ये तरुणासोबत पळून गेली होती. दोघेही चेन्नईला गेले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेत तिला घरी परत आणले होते आणि तरुणासोबत यापुढे बोलू नको आणि त्याला भेटू नको सांगितले होते. मुलीने या तरुणासोबत बोलणं सोडलं. आरोपी तरुणाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मुलीचे काही अश्लिल फोटो तयार केले.

Mumbai Crime: 'ते' फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी,  बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
Crime: अंबरनाथमध्ये कोयता गँगचा थरार, ९ जणांकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

या फोटोच्या माध्यमातून तो तिला धमकी देऊ लागला. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल करेल असं धमकावत तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. यामुळे घाबरलेल्या मुलीने घरातून काही पैसे चोरले आणि बॉयफ्रेंडला दिले. घरातील पैसे चोरीला गेल्याचे कळताच मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी तरुणाला ताकीद देत सोडून दिले होते.

Mumbai Crime: 'ते' फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी,  बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, ऊसतोड कामगाराचं भयंकर कृत्य

पण आरोपीकडून सतत होत असलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे मुलगी मानसिक तणावात गेली होती. त्यामुळे तिने बुधवारी घरात कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर मुलीचा बॉयफ्रेंड फरार झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अतंर्गत गुन्हा दाखल करत शोध सुरू केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे गोरेगावमध्ये खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime: 'ते' फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी,  बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com