Uttar Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Crime: दारू पाजली, नंतर मफलरने गळा आवळा; शिर धडावेगळं केलं अन्...; महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. दारू पाजून नंतर मफलरने गळा आवळून नवऱ्याची हत्या करण्यात आली. ओळख पटू नये यासाठी मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले. तर शिर एका बोअरवेलमध्ये टाकून देण्यात आले.

Priya More

Summary -

  • फिरोजाबादमध्ये बायकोने नवऱ्याची निर्घृण हत्या केली

  • प्रेमप्रकरणातून बॉयफ्रेंडसोबत कट रचल्याचा पोलिसांचा आरोप

  • मृतदेह बोअरवेलजवळ आढळल्याने परिसरात खळबळ

  • तिन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक

महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याची घटना घडली. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये ही घटना घडली. आरोपींनी आधी दारू पाजली, नंतर मफलरने त्याचा गळा आवळला. त्यानंतर शिर धडावेगळं करून बोअरवेलमध्ये फेकले. महिलेने बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राच्या मदतीने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला होता. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

सौरभ (२६ वर्षे) हा मूळचा एटा येथील रहिवाली होता. फिरोझाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारखी येथे सौरभचा मृतदेह आढळून आला होता. शेतातील एका ट्यूबवेलजवळ त्याचा मृतदेह सापडला होता. सौरभच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. सौरभच्या बायकोचे लग्नाआधीपासून सूरज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सौरभला जेव्हा ही गोष्ट माहिती पडली तेव्हा त्याने दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला.

पोलिसांनी सांगितले की, सौरभने विरोध केल्यामुळे त्याच्या बायकोने बॉयफ्रेंड सूरजच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला. सूरजने ९ जानेवारी रोजी रात्री उशिरा सौरभला भेटण्यासाठी बोलावले. त्याचा मित्र सलमानही सूरजसोबत आला होता. दोघांनी सौरभला दारू पाजली आणि त्यानंतर त्याचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने सौरभचे शिर धडावेगळं केलं आणि शिर बोअरवेलमध्ये फेकले. तर त्याच्या धडावरून कपडे काढून मृतदेह नग्नावस्थेत ठेवला जेणेकरून कुणाला सौरभची हत्या झाल्याचे कळू नये. त्यानंतर सौरभची दुचाकी आणि मोबाईल आरोपींनी कोटला रोडजवळ झाडांमध्ये लपवून ठेवले.

सोमवारी एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून चार पोलिस पथकांनी नागला कुम गावाजवळ वेढा घातला. पोलिसांना पाहून आरोपी सलमान आणि सूरज यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुख्य आरोपी सूरजच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सौरभची बायको, तिचा बॉयफ्रेंड सूरज आणि सलमान या तिघांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : फुल टू धमाल! 'गोव्यातील' Hidden पिकनिक स्पॉट, वीकेंड होईल खास

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

मुलाच्या अंगात राक्षस शिरला, आई अन् बायकोला दगडानं ठेचलं, मांस खाल्ला; हैवानी कृत्य बघून अख्खं गाव हादरलं

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

Amruta Deshmukh: साडीत उंदीर,घाणेरडं वॉशरुम; पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दयनीय अवस्थेवर मराठी अभिनेत्री संतापली

SCROLL FOR NEXT