Crime: तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत कुटुंबीयांनी पकडलं. संतप्त होत दोघांनाही विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला.
Crime: तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू
Uttar Pradesh Crime Saam Tv
Published On

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली

  • तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या स्थितीत कुटुंबीयांनी पाहिलं

  • दोघांना कुटुंबीयांकडून विटा-दगड आणि काठ्यांनी मारहाण

  • तरुण- तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. उत्तर प्रदेशच्या एटामध्ये रविवारी ऑनर किलिंगची घटना घडली. या ठिकाणी २० वर्षीय तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत घरकामध्येच नको त्या अवस्थेत कुटुंबीयांनी पकडलं. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

Crime: तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू
Crime: घरी जाणाऱ्या तरुणीचं अपरहण, जबरदस्ती दारू पाजली; ६ जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

रविवारी रात्री उशिरा एटातील जैथरा येथील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. तरुणीच्या कुटुंबीयांना हे माहिती पडताच त्यांनी घरी धाव घेतली. यावेळी दोघांनाही त्यांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यावेळी मुलीचे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी चोर चोर असं जोरजोरात ओरडण्यास सुरूवात केली.

Crime: तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू
Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुण आणि तरुणी दोघांनाही विटा, दगड आणि काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तरुण आणि तरुणीला इतकी मारहाण करण्यात आली की दोघेही रक्तबंबाळ झाले. चोर असल्याचा संशय आल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी पोहचल्यानंतर तरुण दीपक असल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Crime: तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू
Crime News: रात्री आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची, नंतर बॉयफ्रेंडसोबत...; आठवीच्या विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत उशिर झाला होता. तरुण-तरुणीला इतक्या वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली होती की यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Crime: तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून विटा-दगड अन् काठ्यांनी बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू
Crime News : लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार; बीड पोलिसाचं हादरवणारं कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com