Chopda Crime News Saam tv
क्राईम

Crime News: आधी पत्नीची हत्या, नंतर रेल्वे समोर उडी घेत संपवलं जीवन; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

Man Killed His Wife : देवरियामध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या जोडप्याच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिस विभागात एकच खळबळ उडाली.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशच्या देवरिया एक धक्कादायक घटना घडलीय. एका युवकानं आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केलीय. नवरा-बायकोच्या मृत्यूनंतर परिसरात मोठी खळबळ माजलीय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळालीय. यात सुसाइड नोटमध्ये धक्कादायक बाब समोर आलीय.

आत्महत्या करणाऱ्या नवऱ्यानं आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केलेत. दरम्यान ही घटना सलेमपूर परिसरातील माथापार भागात घटना घडलीय. जितेंद्र कुशवाहा, असं आत्महत्या पतीचं नाव आहे. तो आपल्या पत्नीसह सूरतमध्ये राहत होता. जितेंद्र कुशवाह आपल्या पत्नीसह गावात आला होता. रविवारी त्याने सलेमपूर-बरहज रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली.

तेथील बुद्धीराम गढवा येथे त्याने रेल्वे गाड्यासमोर उडी मारत जीव दिला होता. त्याच्या आत्महत्येची माहिती गावातील नागरिकांना माहिती पडली तेव्हा ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुरुवातीला गावकरी त्याच्या घराकडे गेले. तेथे गावकऱ्यांना जितेंद्र कुशवाह याची पत्नी बेडवर मृतावस्थेत आढळून आली. गावकऱ्यांनी याची माहिती सीओ दीपक शुक्ला आणि पोलीस इन्स्पेक्टर संतोष कुमार यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना जितेंद्र कुशवाह याच्या पत्नीच्या कपड्यांमध्ये एक सुसाईड नोट सापडली.

सुसाइड नोटमध्ये धक्कादायक माहिती उघड

पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट मिळून आलीय, त्यात धक्कादायक बाब उघड झालीय. जितेंद्र कुशवाह याने सुसाइड लिहिली आहे, यात त्याने आपणच पत्नीची हत्या केली, असल्याचा म्हटलंय. यात कोणाचाच सहभाग नाहीये. मीच तिची हत्या केलीय. तिचे अनैतिक संबंध होते. तिला पळून जायचं होतं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्यात अडकवायचे होते. दरम्यान या प्रकरणी माहिती देताना सीओ सलेमपूर दीपक शुक्ला म्हणाले, घटनास्थळी पोहोचून तपास करण्यात आला.

घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आलीय. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सुरुवातीच्या तपासात असे दिसते की तरुणाने प्रथम आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पोस्टमॉर्टेम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT