मित्राला चहासाठी बोलावलं, डोळ्यात मिरची पूड टाकली, तोंडात काठी कोंबली, तरुणाला बेदम मारहाण; पुणे हादरलं

Pune Crime : महिलेने मित्रावर हा हल्ल्या केल्यानंतर तिचा पती आणि इतर दोन साथीदार घरी आले. ते बराचवेळ हे सर्व घडण्याची वाट पाहात होते. चौघांनी मिळून पीडिताला बेदम मारहाण केली.
Kondhwa assault case
Kondhwa assault caseSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या जुन्या मित्राला चहासाठी घरी बोलावून त्याच्याविरुद्ध भयानक कट रचला. प्रथम मोठ्या आपुलकीने मित्राला घरी बोलावलं आणि तो घरात येताच महिलेने त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. मिरचीमुळे डोळे झोंबायला लागल्यामुळे त्याला दिसणं बंद झालं. पण या महिलेनं हे सर्व का केलं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

महिलेनं मित्रावर हा हल्ला केल्यानंतर तिचा पती आणि इतर दोन साथीदार घरी आले. ते बराचवेळ हे सर्व घडण्याची वाट पाहात होते. चौघांनी मिळून पीडिताला बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्याच्या तोंडात काठी कोंबली आणि हात-पाय दोरीने घट्ट बांधले गेले. या घटनेवरून स्पष्ट होतं की हे सर्व काही आधीच नियोजित होतं.

Kondhwa assault case
Sinnar Bus Station: सिन्नर तालुक्याला पावसानं झोडपलं; शिवशाहीवर 'हायटेक' बस स्थानकाचं छत कोसळलं

पीडिताला हे सर्व पूर्णपणे असहाय्य होत होते. त्यानंतर आरोपींनी त्याच्याकडे खंडणीची मागणी केली. हे प्रकरण केवळ हल्ल्याचं नव्हे, तर सुनियोजित अपहरण आणि पैशांची मागणी यांच्याशी संबंधित होतं. ही बाब समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. कोंढवा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वेळ न दवडता तात्काळ कारवाई केली. अवघ्या चार तासांत त्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि या चार आरोपींना अटक करण्यात आली.

अटक केलेल्यांमध्ये महिला सोनल उर्फ सोनी रायकर (वय ३५), तिचा पती अतुल रायकर (वय ३८) आणि त्यांचे दोन साथीदार रवी मंडल (वय २४) व सुशांत हान (वय ३१) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी पुण्यातील कोंढवा परिसरातील रहिवासी आहेत. पीडित व्यक्तीचे वय ३९ वर्ष आहे आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Kondhwa assault case
Pune Tadiwala News : झोपडपट्टीतील अरुंद गल्लीत अडकली गरोदर गाय; अग्निशमन दलाच्या अशी केली सुटका, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com