Pune Tadiwala News : झोपडपट्टीतील अरुंद गल्लीत अडकली गरोदर गाय; अग्निशमन दलाच्या अशी केली सुटका, वाचा सविस्तर

Pune Tadiwala latest Update : झोपडपट्टीतील अरुंद गल्लीत गरोदर गाय अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून गायीची सुटका केली.
Pune Tadiwala
Pune Tadiwala latest Update :Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात एका झोपडपट्टीतील गल्लीत गाय अडकल्याची घटना घडली. पुण्यातील ताडीवाला रोड येथील अरुंद गल्लीत आठ महिन्यांची गरोदर गाय अडकली. झोपडपट्टीतील गल्लीत गाय अकडल्यानंतर अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल होत सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. काही तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी गरोदर गायीची सुटका केली. त्यानंतर स्थानिकांनी गायीच्या सुटकेचा निश्वास सोडला.

पुण्यातील ताडीवाला रोड येथील झोपडपट्टीत एका अरुंद गल्लीमध्ये आठ महिन्यांची गरोदर असलेली गाय अडकली होती. गाय अडकल्याने अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल होत सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. गाय अडकल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सेफ्टी बेल्ट, रश्शी, पुली अशा विविध उपकरणांच्या साहाय्याने अडकलेल्या गायीला बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी एल आकार अरुंद गल्लीमुळे (दीड ते दोन फूट) मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. पुली लावून गायीचे अडकलेले पाय बाहेर काढून उभे करण्याचा प्रयत्न केला. जवळपास सर्व प्रकारे प्रयत्न करीत असताना मदतीकरिता वाईल्ड लाईफ रेस्क्यु टीम दाखल झाली. त्याचवेळी त्यांनी ही विविध उपकरणे वापरत सुटकेचे प्रयत्न केले.

Pune Tadiwala
Rahuri to Shani Shingnapur : मोठी बातमी! राज्यात आणखी एका रेल्वे मार्गाला मान्यता, ४९४ कोटी रुपयांचा खर्चही मंजूर

शेवटी गल्लीमधील रहिवाशांच्या घराबाहेरील चार जीने आणि कट्टे काढून हळुवारपणे गायीला बाहेर काढण्यात यश आले. या सर्व कामगिरीकरिता जवळपास दहा तासांचा अवधी लागला. गाय बाहेर येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

Pune Tadiwala
Shocking News : ६ तासांत ५८३ पुरुषांशी शारीरिक संबंध; तरुणी थेट रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

पुण्यातील ताडीवाला रोड येथील जुनी पोलीस चौकी येथे पहाटे एक गाय अरुंद गल्लीमध्ये अडकली होती. जिथे गाय अडकली आहे, ती लेन अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाला अडचणीचा सामना करावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी कसोशीने प्रयत्न केले. गल्ली अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. अग्निशमन दलाकडून क्रेनच्या साहाय्याने गायीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात देखील एक गाय एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com