Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: कॉन्स्टेबलनेच केला महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार, उत्तर प्रदेशमधील खळबळजनक घटना

Uttar Pradesh Crime News: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कॉन्स्टेबलनेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार जालौन जिल्ह्यातून समोर आला आहे.

Rohini Gudaghe

Constable Physically Abused Woman Police

उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने बलात्कार केल्याचा आरोप आहे. याबाबत पीडित महिला कॉन्स्टेबलने अधिकाऱ्यांना याबाबत माहिती (Crime News) दिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पीडित महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी पोलीस कॉन्स्टेबल आणि ती महिला पोलीस ठाण्यात तैनात होते. महिलेने सांगितले की, यावेळी त्यांच्यात जवळीक (Physically Abused Woman Police) वाढली. संधीचा फायदा घेत आरोपी पोलीस कॉन्स्टेबलने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. महिला कॉन्स्टेबलने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती आरोपी कॉन्स्टेबलला विरोध करायची, तेव्हा तो तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार

पीडित महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले (Uttar Pradesh Crime News) आहेत. महिलेच्या तक्रारीत आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विवाहित असल्याचीही माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. महिला कॉन्स्टेबलने जीवाच्या भीतीमुळे बराच वेळ तक्रार केली नाही. आरोपीची बदली झाल्यानंतर महिलेने संपूर्ण प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांसमोर ठेवले आहे.

आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मवीर सिंग असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या पोलीस लाईनमध्ये तैनात आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोपींविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला (Physically Abused) आहे. या घटनेबाबत जालौनचे पोलीस अधीक्षक डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीच्या आधारे आरोपी कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (crime) आहे. संबंधित पोलीस ठाण्याला तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

Bihar Election Result : बिहारमध्ये सत्ता कुणाकडे? पहिला कौल भाजपच्या बाजूने, एनडीएची मोठी आघाडी

SCROLL FOR NEXT