LUCKNOW WOMAN INSPECTOR ACCUSES FATHER-IN-LAW OF RAPE, QUESTIONS POLICE DELAY Saam Tv
क्राईम

Shocking : धक्कादायक! महिला इंस्पेक्टरवर सासऱ्याकडून बलात्कार; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली पण...

Uttar Pradesh Crime News : लखनौमध्ये एका महिला इंस्पेक्टरने स्वतःच्या सासऱ्यांवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. तक्रार देऊनही पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी उशीर केल्याचा आरोप केला आहे.

Alisha Khedekar

  • लखनौमध्ये महिला इंस्पेक्टरने सासऱ्यांवर बलात्काराचा आरोप केला

  • तक्रार करूनही पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केली

  • महिला अधिकाऱ्याने स्थानिक पोलिसांच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिला इंस्पेक्टरने स्वतःच्या सासऱ्यांवर बलात्काराचा गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने केवळ आरोपीवरच नव्हे, तर स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तक्रार देऊनही पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला इंस्पेक्टरचे लग्न झाल्यापासून तिचे सासरे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. याबद्दल पीडितेने कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर धमकवण्यात आले, तसेच आरोपीच्या काळ्या कृत्यांना पाठिंबा देण्यात आला. महिला इंस्पेक्टरच्या म्हणण्यानुसार, त्या गेल्या चार दिवसांपासून लखनौमधील पारा पोलीस स्टेशन आणि हान्स खेडा चौकीच्या सतत फेऱ्या मारत होत्या. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट पोलिसांनी पुरावे मागत गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान जेव्हा पीडितेने हान्स खेडा चौकी प्रभारी अधिकाऱ्यांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा तिला मदत करण्याऐवजी धमकावण्यात आले. चौकी प्रमुखाने त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. महिला पोलीस अधिकारी असल्यामुळे स्वतःला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्वतः पोलीस दलात कार्यरत असूनही माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, हे प्रकरण चिघळल्यानंतर लखनौ पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT