व्यावसायिकाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या
दोन मोटारसायकलींवर आलेल्या चार हल्लेखोरांनी नियोजित पद्धतीने हल्ला केला
खंडणीच्या वादातून हत्या झाल्याचा आरोप
या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले
Uttar Pradesh Vinit Ray Murder News उत्तर प्रदेशच्या गाझीपूर शहरातील सदर कोतवाली परिसरातील बिंदू हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री धक्कादायक घटना घडली. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आलोक राय यांचा मुलगा विनीत राय याची चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनीत राय शुक्रवारी रात्री हॉटेलमध्ये कामकाज पाहून घरी जाण्यासाठी निघाला होता. हॉटेलजवळ हल्लेखोर आधीच दबा धरून बसले होते.हल्लेखोरांनी आधी हॉटेलच्या सुरक्षारक्षकाकडे बिअर खरेदी करण्याच्या बहाण्याने विनीतची चौकशी केली आणि पेमेंट करण्याच्या बहाण्याने काही वेळ तिथेच घालवला. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास विनीत हॉटेलच्या गेटजवळ आपल्या कारकडे जात असताना दोन मोटरसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्याला घेरले.
दरम्यान, विनीत हॉटेलमधून बाहेर आला. त्याला पाहताच आरोपींनी कमरेतून पिस्तूल काढले आणि त्याच्यावर गोळीबार सुरू केला. विनीतच्या हाताला आणि कमरेला प्रत्येकी एक गोळी लागली, तर छातीत दोन गोळ्या झाडण्यात आल्या. जीव वाचवण्यासाठी तो पळण्याचा प्रयत्न करत असतानाच हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून गोळीबार केला. गंभीर जखमी झालेला विनीत जागीच कोसळला.
हल्लेखोरांनी सुरक्षारक्षकावरही हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र तो हॉटेलमध्ये पळून गेल्याने बचावला. त्यानंतर आरोपींनी हवेत गोळीबार करत घटनास्थळावरून पलायन केले. माहिती मिळताच आलोक राय आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विनीतला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विनीतचे लग्न वर्षभरापूर्वी झाले होते आणि त्याला दोन महिन्यांची मुलगी आहे. एमएससी आणि डी. फार्मा शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हॉटेल सांभाळत होता. आलोक राय यांनी शंकर पांडे नावाच्या गुन्हेगारावर हत्येचा आरोप करत खंडणी न दिल्यामुळे मुलाची हत्या झाल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.