उत्तर प्रदेशमध्ये भावाने बहिणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बागपत जिल्ह्यातील छपरौली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोढा गावामध्ये ही भंयकर घटना घडली. एका तरुणाने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केला असता संतप्त होऊन तरुणाने तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बोढा गावामध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटी होती. तिचे घरातले शेतामध्ये कामासाठी गेले होते. ती एकटी असल्याचा फायदा घेत तिचा चुलत भाऊ घरामध्ये घुसला. त्याने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार करण्याचा प्रय्तन केला. मुलीने त्याला विरोध केला. तर त्याने रागाच्या भरामध्ये ५ किलो वजनाचा सिंडेर तिच्या डोक्यात घातला. पीडित मुलगी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळली. यानंतर आरोपीने तिच्यावर फावड्याने वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच फावड्याने खोलीमध्ये खड्डा खोदला आणि तिचा मृतदेह त्यामध्ये टाकून माती टाकली. पण मृत मुलीचा मृतदेह जमिनीमध्ये व्यवस्थित पूरला गेला नाही. मृत मुलीची आई घरी आली. मृतदेह पाहून ती जोरजोरात ओरडू लागली. महिलेचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागगरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते देखील आले. त्यांनी जमिनिमध्ये गाडलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला.
या प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. मुलीने नात्याला विरोध केल्यामुळे त्याने तिची हत्या केली आणि मृतदेह लपवून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.