Bride murders groom just before wedding in Rampur; body recovered from forest, two arrested. Police search on for bride and third accused. 
क्राईम

Wedding Turns Tragic : लग्नाच्या आदल्या रात्रीच होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, नवरी प्रियकरासोबत झाली फरार

Groom killed by bride and her boyfriend in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये लग्नाच्या आदल्या दिवशीच होणाऱ्या नवऱ्याचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. निहाल नावाच्या तरुणाचा खून त्याची होणारी पत्नी गुलफशा हिने आपल्या प्रियकर आणि साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Bride murders groom hours before wedding : मागील काही दिवसांत लग्नानंतरच्या हत्या आणि खूनकांडांनी देशात खळबळ उडाली आहे. सोनम आणि राजा प्रकरणाने तर खळबळ उडवली होती. आता लग्नापूर्वीच मुलीने प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ही घटना घडली. लग्नाच्या आदल्या रात्रीच नवऱ्याची हत्या झाली. सोमवारी पोलिसांनी नवरदेवाचा मृतदेह शोधून काढला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणी नवरी, तिचा प्रियकर आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

रामपूरच्या मोहल्ला गूजर येथील ३५ वर्षीय निहाल याचा होणाऱ्या पत्नीने खून केला. निहाल लग्न समारंभात जेवण बनवण्याचे काम करायचा. चार महिन्यांपूर्वी त्याचे धनुपुरातील गुलफशासोबत लग्न ठरले होते. १५ जून २०२५ रोजी त्यांचा विवाह होणार होता. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. हळदीचा समारंभही उत्साहात पार पडला. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशी गुलफशाने प्रियकराच्या मदतीने निहालचा काटा काढला. खून करून दोघेही फरार झाले.

लग्नापूर्वी निहालच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. १४ जून रोजी निहालला एक फोन आला. नवरीचा चुलत भाऊ असल्याचे सांगून त्याला कपडे खरेदीसाठी बोलावण्यात आले. दोन तरुण दुचाकीवरून त्याला घेऊन गेले. रात्र झाली तरी निहाल घरी परतला नाही, म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. नातेवाईकांनी गुलफशा आणि तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन संशयित तरुणांची ओळख पटली. चौकशीत आरोपींनी हत्येची कबुली दिली. त्यांच्या माहितीवरून सोमवारी सकाळी अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनपुरा जंगलातून निहालचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले.

निहालचा भाऊ नायाब शाह यांच्या तक्रारीवरून गुलफशा, तिचा प्रियकर सद्दाम, फरमान आणि अनीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे प्रभारी पवन कुमार शर्मा यांनी सांगितले की, सद्दाम आणि फरमान यांना अटक झाली आहे, तर गुलफशा आणि अनीस यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT