Uttar Pradesh Shocking News Saam Tv
क्राईम

Shocking News: मेहुणीशी लग्न करण्यासाठी झाला उतावळा, नवऱ्याने ६ महिन्यांच्या गरोदर बायकोला संपवलं

Uttar Pradesh Police: उत्तर प्रदेशमध्ये नवऱ्याने आपल्या सहा महिन्यांच्या गरोदर बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेहुणीशी लग्न करण्यासाठी आरोपीने हे कृत्य केलं. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

उत्तर प्रदेशच्या एटामध्ये भयंकर घटना घडली. तिसरं लग्न करण्यासाठी उतावळा झालेल्या नवऱ्याने ६ महिन्यांच्या गरोदर बायकोची हत्या केली. जैथरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नगला डांडे गावात ही धक्कादायक घटना घडली. एका दारू कंत्राटदाराने आपल्या गर्भवती बायकोची गळा दाबून हत्या केली. शनिवारी रात्री या महिलेचा मृतदेह बेडवर आढळून आला. या घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य शेजारच्यांच्या घरी पार्टीला गेले होते.

घटनेची माहिती मिळताच जैथरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फील्ड युनिट्स आणि श्वान पथकांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृत महिलेच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मृत महिला ६ महिन्यांची गरोदर होती. तिचे २०२० मध्ये आरोपी उपेंद्रशी लग्न झाले होते. लग्नापासूनच आरोपी बायकोला मारहाण करत होता आणि तिचा छळ करत होता. या त्रासाला कंटाळून ती काही दिवसांपूर्वी फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहल्ला चौहट्टा येथील तिच्या माहेरी गेली होती. पण आरोपीने बायकोला परत सासरच्या घरी आणले होते. त्यानंतर त्याने तिची हत्या केली. महिलेच्या मानेवर आणि पाठीवर जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे हत्येपूर्वी तिला मारहाण केल्याचे देखील बोलले जात आहे.

आरोपी उपेंद्रच्या पहिल्या बायकोचा देखील असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर त्याने बायकोच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न केले. पण त्याने तिचा देखील छळ करून तिची हत्या केली. आरोपी उपेंद्रला बायकोच्या धाकट्या बहिणीसोबत लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने आपल्या बायकोची गळा दाबून हत्या केली. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी उपेंद्रवर आरोप केला की, उपेंद्र अनेकदा त्याच्या बायकोला दररोज मारहाण करायचा आणि तिला उपाशी ठेवायचा. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT