Shocking News: बाप बनला हैवान! पोटच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता राहिली गरोदर

Hingoli Crime: हिंगोलीमध्ये बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला. १२ वर्षांची मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे हिंगोलीमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली.
Shocking News: बाप बनला हैवान! पोटच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता राहिली गरोदर
Hingoli CrimeSaam Tv
Published On

संदीप नागरे, हिंगोली

हिंगोलीमध्ये बापाने पोटच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे हिंगोलीमध्ये खळबळ उडाली आहे. जीवे मारण्याची धमकी देत बापाने मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. याप्रकरणी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत हिंगोली पोलिसांनी त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली. बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने बलात्कार केला. या धक्कादायक घटनेमुळे हिंगोलीत एकच खळबळ उडाली. बापाने सातत्याने केलेल्या लैंगिक अत्याचारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली त्यानंतर हा गंभीर प्रकार उघड झाला.

Shocking News: बाप बनला हैवान! पोटच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता राहिली गरोदर
Ulhasnagar Crime : समर कॅम्पमध्ये चिमुकल्यासोबत संतापजनक प्रकार, डॉक्टरांकडे नेताच आई-वडील हादरले, डान्स टीचरनेच...

दरम्यान बाळापूर पोलिसांनी या प्रकरणात बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत नराधम बापाला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःची पत्नी डोळ्याने अंध असल्याचा फायदा घेत या नराधम बापाने आपल्या लेकीलाच वासनेची शिकार बनवले. स्वतःच्या मुलीवर वारंवार बलात्कार करून बापाने मुलीला गरोदर केलं.

Shocking News: बाप बनला हैवान! पोटच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता राहिली गरोदर
Crime News: आधी पत्नीची हत्या, नंतर रेल्वे समोर उडी घेत संपवलं जीवन; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

बलात्काराची कबुली कुणाला दिली तर जिवे मारून टाकू अशी धमकी देखील हा नराधम बाप आपल्या मुलीला देत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सध्या पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे पीडित मुलीच्या अंध आईला देखील मोठा धक्का बसला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

Shocking News: बाप बनला हैवान! पोटच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता राहिली गरोदर
Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बायकोला गळा चिरुन संपवलं, मृतदेह शेणात लपवला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com