UP man beaten by in-laws after not buying samosas for wife; video goes viral. saam tv
क्राईम

Shocking News: समोसे आले जिवाशी! पत्नीची इच्छा पूर्ण न करणाऱ्या पतीला सासरच्यांकडून मारहाण | Video Viral

Husband Assaulted Over Samosa Dispute: उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये एका व्यक्तीला समोशामुळे मारहाण झालीय. समोश्याची मागणी पूर्ण न केल्याने त्याला त्याच्या सासरच्यांनी मारहाण केली. ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झालीय.

Bharat Jadhav

  • उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये समोश्यावरून वाद झाला.

  • पत्नीला समोसे न दिल्यामुळे तिने माहेरच्यांना बोलावलं.

  • माहेरच्यांनी पतीला मारहाण केली आणि प्रकरण पंचायतपर्यंत गेलं.

पत्नीची मागणी पूर्ण न करणं एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीला समोश्यामुळे एक व्यक्ती मरता मरता वाचलाय. ही घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये घडलीय. येथील एका महिलेला तिच्या नवऱ्यानं समोसे घेऊन दिले नाही, त्यामुळे तिने तिच्या माहेरच्यांना बोलवून पतीला मारहाण केलीय. पत्नीची समोसेची इच्छा पूर्ण न झाल्यानं पत्नीने आपल्या माहेरच्यांना सासरी बोलवलं.

इतकेच नाही तर समोसामुळे झालेल्या भांडणाची प्रकरण गावाच्या पंचायतपर्यंत गेलं. पंचायत सुरू असतानाच महिलेच्या माहेरच्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी भगवन्तापुर गावात ही घटना घडलीय. या गावात संगिता आपल्या नवरा शिवमसोबत राहते. संगितला समोसे खाण्याची इच्छा झाली होती. तिने शिवमला स्वीट मार्टमधून समोसे आणण्यास सांगितले.

परंतु शिवम काही कारणामुळे समोसे आणण्यास विसरला. त्यामुळे पत्नी संगिता नाराज झाली. समोसेवरून संगिता आणि शिवम यांच्यात ३१ तारखेला जोरदार भांडण झालं. त्यानंतर संगिताने या भांडणाची माहिती तिच्या घरच्यांना दिली. तिच्या सांगण्यावरून तिच्या माहेरची सर्व मंडळी शिवमच्या घरी आले. त्यानंतर माजी गावप्रमुख अवधेश शर्मा यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली. या पंचायतीदरम्यान रागावलेल्या संगिताने कुटुंबातील सदस्यांसह पती शिवम आणि त्याच्या आईला मारहाण केली.

दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतोय. शिवमची आई विजय कुमारी यांनी समोश्यांच्या वादातून घडलेल्या महाभारताबद्दल लेखी तक्रार दाखल केलीय. यावरून कोतवाली पुरणपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मारहाणीत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सासरच्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे.

पुरनपूर येथील प्रतीक दहिया यांनी शिवमची आई विजय कुमारी यांनी त्यांच्या मुलाने तक्रार दिल्याचं सांगितलं. तक्रारीनुसार, पत्नी संगिता, तिची आई उषा, वडील रामलडैते आणि काका रामोतार यांच्यासह चार जणांविरुद्ध बीएनएस कलम १०९ अंतर्गत हत्येचा प्रयत्नासह मारहाण करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT