tuljapur police booked 11 in tulja bhavani mandir sansthan gold theft case saam tv
क्राईम

Tuljapur News: सर्वांत माेठी बातमी : तुळजाभवानी दागिने चोरी प्रकरणी महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट व इतर काही माैल्यवान दागिने गायब झाले हाेते.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljapur News :

तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे दागिन्यांच्या चाेरी प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या (tuljabhavani mandir sansthan) तक्रारीनंतर तुळजापूर पाेलिसांनी 4 महंतासह 7 जणांवर गुन्हा नोंदविला आहे. याबाबतची माहिती अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, धाराशिव) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट व इतर काही माैल्यवान दागिने गायब असल्याचा दागिने तपासणी समितीस आढळले हाेते. त्याबाबतचा अहवाल समितीने दोन महिन्यांपुर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिला हाेता.

त्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने कुणालाही पाठिशी न घालता या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी दागिन्यांची तपासणीसाठी नेमलेल्या मोजदाद समितीचे सदस्य तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम (amarraje kadam) यांनी केली हाेती.

दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने तुळजापूर पाेलिसांनी 4 महंतासह 7 जणांवर गुन्हा नोंदविला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महंत हमरोजीबुवा, गुरु चिलोजीबुवा, वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा या चार महंतासह मयत धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे व अज्ञात अशा 7 संशयितांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात (कलम 420, 406, 409, 381 व 34 आयपीसी नुसार) गुन्हा नोंदविल्याची माहिती अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, धाराशिव) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT