trader complaints about 4 cheated him for 3 crore 15 lakh rupees in hingoli Saam Digital
क्राईम

हिंगाेलीमधील व्यापा-याची 3 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक, अकाेल्यातील 4 व्यापा-यांवर गुन्हा दाखल

hingoli trader complaints about cheatingd him for lakhs of rupees : हिंगोली पोलिसांनी चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

संदीप नागरे

हिंगोली शहरात भुसार व्यापाऱ्याची 3 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. या प्रकरणी हिंगाेली पाेलिसांनी अकाेला येथील चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा नाेंदविला आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

हिंगोलीच्या एनटीसी परिसरात सुप्रसिद्ध असलेले व्यापारी दामोदर मुंदडा व त्यांचा मुलगा लक्ष्मीनारायण मुंदडा हे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करतात. त्यानंतर ते उद्योजकांसह व्यापाऱ्यांना त्याची विक्री करतात.

मुंदडा यांच्याकडून अकोला येथील व्यापारी मनीष कोटेचा, आशिष दोरकर, मोहिनी दोरकर यांनी 3 कोटी 15 लाख रुपयांचा तूर, सोयाबीनसह हरभरा माल खरेदी केला. परंतु त्यांनी खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली.

दरम्यान माल खरेदी करणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांनी आपली फसवणूक केल्याचे मुंदडा यांच्या लक्षात आले. त्यांनी पाेलिसांत धाव घेतली. मुंदडा यांनी चार जणांच्या विरोधात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार हिंगोली पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मतमोजणीपूर्वी महत्त्वाचे पाऊल पाऊल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT