Tamilnadu crime saam tv
क्राईम

Crime: ५० वर्षीय महिलेवर बलात्कार; तरुणाने पार्कमध्ये खेचत नेत केलं भयंकर कृत्य, नंतर...

Tamilnadu crime: तामिळनाडूमध्ये भयंकर घटना घडली. ५० वर्षीय महिलेवर २४ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. कामावर निघालेल्या महिलेला पार्कमध्ये खेचत नेत आरोपीने हे भयंकर कृत्य केले.

Priya More
  • तामिळनाडूमध्ये ५० वर्षीय महिलेवर बलात्कार

  • २४ वर्षीय तरुणाचे भयंकरकृत्य

  • आरोपीला पोलिसांनी केली अटक

  • घटनेमुळे तामिळनाडू हादरले

तामिळनाडूमध्ये ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. तामिळनाडूच्या तिरुपथूर जिल्ह्यात ही घटना घडली. कामावर निघालेल्या महिलेला २४ वर्षीय तरुणाने पार्कमध्ये खेचत नेत हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोमवारी पहाटे कामासाठी निघाली होती. त्याचवेळी आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तिला पकडून पार्कमध्ये ओढत नेले. त्याठिकाणी आरोपीने महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी गुन्हेरारी प्रवृत्तीचा आहे. तो जामीनावर बाहेर आला होता. आरोपी मानसिक अस्थिरतेवर उपचार घेत असल्याचे सांगितले जात आहे. तपासाचा भाग म्हणून त्याच्या वैद्यकीय नोंदींची पडताळणी केली जात आहे. तपास सुरू असून निष्पन्न झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

तामिळनाडूमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामुळे सत्ताधारी टीव्हीके आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. टीव्हीके सरकारने अलीकडेच महिलांची सुरक्षिततेसाठी आणि महिलांवरील गुन्ह्यांना पोलिसांचा प्रतिसाद सुधारण्याच्या उद्देशाने 'सिंगाप्पेन' नावाच्या एका विशेष महिला पोलिस दलाची घोषणा केली आहे. सत्ताधारी टीव्हीकेवर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. पण सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT