Mumbai News
भटक्या कुत्र्यांवरील प्रेम आणि त्यांना अन्न देण्याच्या रागातून अनेकवेळा मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान अशीच एक घटना बोरिवलीतील योगीनगर येथे घडली आहे. येथील एका महिला डॉग फिडरला मारहाण झाली असून याप्रकरणी अमन बनसोडे या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेली महिला भटक्या कुत्र्यांची काळजी घेते. त्यांना अन्न देण्याचं काम करते. या रागातून अमन बनसोडे या व्यक्तीने सदर महिलेच्या पालकांसमोरच तीला मारहाण केली. बोरीवलीतील योगीनगरमध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर या महिलेने याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस अधिक तपास करत आहेत.
भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचा होणारा उपद्रव यामुळे अनेकांमध्ये या कुत्र्यांची भीती असते. शिवाय या कुत्र्यांचे रात्री अपरात्री हल्ले पण वाढले आहेत. त्यामुळे अनेकांना कुत्र्यांबाबत राग आणि चिड असते. मात्र, या भटक्या कुत्र्यांची काहीजण काळजीही घेताना दिसतात. निराधार असल्यामुळे त्यांना अन्न देण्याचं काम करतात. यातून अशा व्यक्तींना अनेकवेळा मारहाण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.