Crime News Saam Tv
क्राईम

Crime: सोनम पार्ट २! लग्नानंतर महिनाभरातच नवऱ्याला संपवलं; चिकनमध्ये विष टाकलं अन्...

Jharkhand Crime: झारखंडमध्ये बायकोने नवऱ्याला भयंकर मृत्यू दिला. नवरा आवडत नसल्यामुळे या महिलेने लग्नाच्या महिनाभरातच त्याचा जीव घेतला. चिकनमध्ये विष टाकून त्याला खायला दिलं. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

इंदुरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरला बसला आहे. राजाची पत्नी सोनमने ज्या पद्धतीने त्याची हत्या केली त्याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. हे प्रकरण ताजे असतानाच अशीच आणखी एक घटना घडली. राजा रघुवंशी प्रकरणापेक्षाही हे भयंकर प्रकरण आहे. या प्रकरणाताली आरोपी महिलेला सर्वजण सध्या सोनम २ म्हणून बोलत आहे. या महिलेने जेवणामध्ये विष टाकून आपल्या नवऱ्याची हत्या केली. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील एका गावामध्ये सोमवारी घडली. १९ वर्षीय नवविवाहित सुनीता सिंहने आपल्या २२ वर्षीय नवरा बुधनाथ सिंहची निर्घृण हत्या केली. नवरा आवडत नसल्यामुळे तिने हे कृत्य केले. लग्नानंतर या महिलेने दोन वेळा नवऱ्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये ती यशस्वी झाली नाही. शेवटची तिने असा कट रचला जे ऐकून पोलिसही चक्रावले.

या महिलेच्या नवऱ्याला चिकन आवडत होते. त्यामुळे तिने नवऱ्यासाठी स्पेशन चिकन बनवले. बायकोने प्रेमाखातर आपल्या आवडीचे जेवण बनवल्यामुळे बुधनाथ सिंहने ते आवडीने खाल्ले. पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. कारण सुनीताने या चिकनमध्ये विष मिसळून नवऱ्याला खायला दिले होते.

ही घटना रांका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहोकुदर गावामध्ये घडली. छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये राहणाऱ्या सुनीताचे लग्न याच वर्षी ११ मे रोजी सुनीतासोबत झाले होते. पण सुनीताला तिचा नवरा अजिबात आवडत नव्हता. त्यामुळे तिने नवऱ्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला. मृत बुधनाथ सिंहच्या आईने सूनेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, सूनेने माझ्या मुलाच्या जेवणामध्ये विष टाकले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेने याआधी देखील दोन वेळा नवऱ्याच्या जेवणात विष मिसळण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याने ते जेवण खाल्ले नाही त्यामुळे तो बचावला होता. रविवारी तिने आपल्या नवऱ्याला चिकन बनवले होते. या चिकनमध्ये तिने किटकनाशक टाकले होते. बुधनाथला चिकन खूप आवडत होते. त्यामुळे त्याने आवडीने चिकन खाल्ले. रात्री चिकन खाल्ल्यानंतर बुधनाथ झोपायला गेला. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसही चक्रावले. या प्रकरणात बुधनाथची बायकोच आरोपी निघाली. कारण तिने याआधी देखील नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. अटकेनंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले होते. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या घटनेमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्याच्या अनुदानात मोठी वाढ; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित कुणाला मिळाली संधी?

Hema Malini Birthday: हेमा मालिनी यांनी चित्रपटात काम करण्यासाठी नाव का बदललं? जाणून घ्या कारण

Men's health checkup: वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषांनी 'या' चाचण्या करूनच घ्याव्यात; या गोष्टींवर लक्ष ठेवा

Maharashtra Live News Update: पालघर - बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळती

SCROLL FOR NEXT