Solapur Crime News SAAM TV
क्राईम

Solapur Crime News: सोलापूर हादरलं! फैजानने बायकोला पेट्रोल टाकून पेटवलं

Woman set on fire: सोलापूरमध्ये पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

विश्वभूषण लिमये

सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लोकमान्य नगर परिसरात एका विवाहित महिलेला तिच्याच पतीने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचं नाव फैजान जावेद शेख असून जखमी महिलेचे नाव नर्गिस फैजान शेख असं आहे. नर्गिस आणि फैजान यांचा 2024 मध्ये निकाह झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच दोघांमध्ये वाद सुरू झाले. घरगुती कारणांमुळे सतत भांडण होत असल्याने दोघेही काही काळापासून वेगळे राहत होते.

तलाक देण्याच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात पुन्हा वाद वाढले होते. या वादातूनच ही गंभीर घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे. काल रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास फैजान हा नर्गिसच्या घरी आला. त्याने नर्गिसच्या आईला विश्वासात घेत, मला नर्गिससोबत बोलायचं आहे, असं सांगितलं आणि तिला एका खोलीत नेले.

पेट्रोल ओतून लायटरने पेटवलं

यानंतर त्याने सोबत आणलेले पेट्रोल नर्गिसच्या अंगावर ओतले. पेट्रोल ओतल्यानंतर त्याने लाईटरने तिला पेटवले. घटना घडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. घरात आग लागल्याचं लक्षात येताच शेजारी आणि कुटुंबीयांनी तत्काळ धाव घेत नर्गिसला वाचवण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नर्गिसची प्रकृती चिंताजनक

सध्या नर्गिसची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्याच्या पीएची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

ममता दीदींकडून केंद्र सरकारची कोंडी, राजीनामा न दिल्यानं संघर्ष वाढणार?

Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT