Solapur Breaking News:  Saamtv
क्राईम

Solapur Crime: दारु पिऊन आईला शिवीगाळ केल्याचा राग, मित्रांनी केलेल्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू; सोलापूर हादरलं

Solapur Breaking News: लखन रघुनाथ गायकवाड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर ,ता. १८ मे २०२४

दारु पिऊन आईला शिव्या दिल्याच्या रागातून मित्रांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली. लखन रघुनाथ गायकवाड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापुरातील बाळे येथील लखन रघुनाथ गायकवाड हा तरुण मित्राच्याच गाडीवर क्लीनर म्हणून काम करतो. शुक्रवारी दुपारी लखन गायकवाड हा दारु पिऊन घरी आला होता. यावेळी त्याने आईकडे पैशाची मागणी करत शिवीगाळ केली.

आईला शिव्या देऊ नको म्हणत त्याचे मित्र नागेश कोळेकर,आशुतोष उर्फ अवी राजू गाडेकर यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही शिवीगाळ करत असल्यामुळे नागेश आणि आशुतोष या दोन्ही मित्रांनी लखन याला लाकडी दांडका आणि काठी, तसेच पाईपच्या साह्याने मारहाण करायला सुरुवात केली.

लखनला मारहाण करताना आई अलका आणि अजय भोसले दोघांनाही मारु नका असे सांगत होते. मात्र तरीही रागाच्या भरात दोघांनीही त्याला मारहाण केली. या मारहाणीत लखन गायकवाड गंभीर जखमी झाला होता. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागेश कोळेकर, आशुतोष उर्फ अवी राजू गाडेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

SCROLL FOR NEXT