नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक हत्याकांड घडलं आहे. जुन्या वादातून मित्राच्या १० वर्षाच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी उरण पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. कांतालाल सीताराम यादव (वय 45) असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरूद्ध बिंदू उर्फ शिवप्रसाद रामाजोर यादव (वय 33) याने तक्रार दाखल केली आहे.
कांतालाल आणि बिंदू हे दोघंही वाहतूकदार (Navi Mumbai Crime News) आहेत. त्यांच्या पिकअप टेम्पोचा वापर करत ते माल वाहतूक करण्याचं कंत्राट घेत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी संध्याकाळी बिंदूला द्रोणागिरीमध्ये माल पोहोचवायचा होता. त्यावेळी उरणमधील कोप्रोली येथून आणखी सामान उचलण्याचं त्याचं नियोजन होतं. बिंदूची बायको आणि मोठी मुलगी एका कार्यक्रमासाठी बाहेर गेली होती.
सहसा बिंदू आपल्या मुलाला सोबत घेऊन जात होता. परंतु यावेळी उशीर होणार असल्यामुळे त्याने मुलाला घरीच ठेवलं होतं. परत येताना बिंदू संध्याकाळी द्रोणागिरी येथे कांतालालला भेटला. त्याने मुलाला घरी सोडण्यास सांगितलं. मुलाची काळजी घेण्यास सांगितलं होतं. परंतु, दुसऱ्या दिवशी जेव्हा बिंदू घरी परतला तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच (Crime News) सरकली. बिंदुला त्याचा मुलगा हर्ष सापडतच नव्हता. त्यामुळे बिंदुने मुलाचा शोधाशोध करण्यास सुरूवात केली.
परंतु मुलगा सापडतच नाही, हे लक्षात आल्यावर त्याने कांतीलालची भेट घेतली. मुलगा कुठे आहे असं बिंदुने विचारलं असता, कांतालालने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बिंदूचा संशय (Man Kills Colleague Son) बळावला. त्याने कांतीलालला पोलीस ठाण्यात नेलं. चौकशीत कांतलालने बिंदूचा मुलगा हर्षची हत्या केल्याची कबुली दिली. उरणमधील भेंडखळ गावातील पाणथळ भागात त्याने मृतदेह लपवला होता, ते पोलिसांना सांगितलं. पोलिसांना त्याने हत्येचं कारण देखील सांगितलं आहे.
एक वर्षापूर्वी बिंदूसोबत झालेल्या कराराच्या वादावरून त्याच्या मनात राग होता. याचा बदला त्याने घेतला आहे. बिंदूचा मुलगा घरी एकटा आहे, याची संधी साधत त्याने मुलाची हत्या केली, अशी कबुली कांतालालने दिली आहे. सुरुवातीला कांतालालने मुलाचा गळा चिरण्याचा (Killed) प्रयत्न केला.परंतु त्यात अपयशी ठरल्याने त्याने मुलीला दलदलीत बुडवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. जुन्या वादामुळे मित्राच्या मुलाचा हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.