Crime News Saam tv
क्राईम

Mumbai Crime News: सॅनिटरी पॅडमधून अंमली पदार्थाची तस्करी, मुंबई विमानतळावरून ३ विदेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Arrested Uganda, Tanzania Women: दोन महिला युगांडा, एक टांझानिया देशाची रहिवासी असून सॅनिटरी पॅड, गुद्वारातून कोकेनची तस्करी करण्यात येत होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Crime news

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर ५६८ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थाची किंमत अंदाजे ५.६८ कोटी रुपये आहे. याप्रकरणी तीन परदेशी महिलांना डीआरआयने अटक केली आहे. दोन महिला युगांडा आणि एक टांझानिया देशाची रहिवासी असून सॅनिटरी पॅड आणि गुद्वारातून कोकेनची तस्करी करण्यात येत होती. या महिलांना अटक करून न्यायालयात हजार करण्यात आले. न्यायालयाने त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

मुंबई विमानतळावर आजपर्यंत अमलीपदार्थविरोधी अनेक कारवाई करण्यात आल्या आहेत. मात्र अलिकडे अमलीपदार्थ लपविण्यासाठी अनेक प्रकारच्या शक्कल लढविल्या जात असतात. त्यातच तस्करीसाठी महिलांचा वापर केला जात आहे. या महिला अमलीपदार्थ गुप्तांग आणि सॅनिटरी पॅडमध्ये लपवून तस्करी करत आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांसमोरील आव्हाने वाढली आहेत. दरम्यान आज डीआरआयने या प्रकरणाचाही पर्दाफाश केला.

विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून महिलांची कसून तपासणी करण्यात आली. सुरुवातीला त्यांच्याकडे काही आढळले नाही. मात्र अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी अमलीपदार्थ गुप्तांग आणि सॅनिटरी पॅडमध्ये लपवल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी त्या महिलांना अमलीपदार्थांसह ताब्यात घेतले. या महिलांवर एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या महिला या अमलपदार्थांची तस्करी कोणासाठी करत होत्या याची चौकशी अधिकाऱ्यांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT