Nashik Crime: जुन्या वादातून भयंकर घडलं.. भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या; नाशिक शहर हादरलं

Nashik Latest News: भरदिवसा झालेल्या या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Latest News
Nashik Latest NewsSaamtv
Published On

तबरेज शेख, प्रतिनिधी

Nashik Crime News:

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. नाशिकमध्ये खुन, दरोडे, मारामाऱ्या असे गंभीर प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून आज ( शुक्रवार १३,ऑक्टोंबर) भरदिवसा झालेल्या आणखी एका हत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या (Nashik) पंचवटी परिसरात अठ्ठावीस वर्षीय तरुणाची त्याच्या मित्रांनीच निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सागर विष्णू शिंदे (वय 28) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून पंचवटी परिसरातील कुसुमाग्रज उद्यान जवळ ही भयंकर घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, पंचवटी परिसरातील कुसुमाग्रज उद्यानजवळ हे चारही मित्र मद्यपान करायला बसले होते. यावेळी मद्यपानादरम्यान जुन्या वादातून एका तरुणाने सागर शिंदे याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये पोटावर आणि डोक्यावर वार झाल्याने सागर शिंदे याचा जागीच मृत्यू झाला.

Nashik Latest News
Dombivli News: खळबळजनक! शिक्षिकेची २५ ते ३० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; संतप्त पालकांचा शाळेला घेराव

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. भरदिवसा झालेल्या या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Nashik Latest News
Ulhasnagar News: मुलाला शाळेत सोडून घरी निघाली आई; अचानक दुचाकीस्वार आले अन् घात झाला, पाहा धक्कादायक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com