Banglore
Banglore Saam TV

Banglore Taxi Incident : कॅब राइड रद्द करताच महिलेसोबत भंयकर घडलं, पोलिसांकडून गुन्हा दाखल, ड्रायव्हरचा शोध सुरू

Taxi Driver : पोलीस आता अश्लील मेसेज पाठवणाऱ्या टॅक्सी चालकाचा शोध घेत आहेत.
Published on

Banglore Crime News :

बंगळुरुमधून एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला टॅक्सीची राईड रद्द करुन मोठा मनस्ताप सहन करावा लागाला आहे. कारण महिलेने टॅक्सी राइड रद्द करताच तिला तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अश्लील फोटो आणि व्हिडीओ येऊ लागले.

या प्रकरणी महिलेच्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता अश्लील मेसेज पाठवणाऱ्या टॅक्सी चालकाचा शोध घेत आहेत. (Latest News)

महिलेने पोलीस तक्रारीत सांगितले की, तिने एका अॅपद्वारे टॅक्सी बुक केली होती. पण तिने नंतर राइड रद्द केली. मात्र राइड रद्द करताच ड्रायव्हरकडून तिला तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यात आले.

Banglore
Yavatmal News: पॅरोलवर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचा शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांतच अटक

महिलेने सांगितले की, तिची मुलगी शाळेतून घरी येत असताना चालण्यास नकार देत होती. म्हणून तिने टॅक्सी बुक केली होती. मात्र बुक केलेल्या टॅक्सीची वाट बघत असतानाच तिची मुलगी रडायला लागली. त्यामुळे तिने बुक केलेली टॅक्सी रद्द करत ऑटोने पटकन घरी जाण्याचा निर्णय घेतला. (Crime News)

मात्र राइड रद्द केल्यानंतर आरोपी दिनेशने वारंवार महिलेला फोन केले. ड्रायव्हरने महिलेला टॅक्सी रद्द न करण्याची विनंती केली. कारण त्याने ५ किमी टॅक्सी चालवत पुढे आणली होती. महिलेने देखील टॅक्सी रद्द करण्याचं सविस्तर कारण सांगितलं आणि माफीही मागितली.

Banglore
Israel-Hamas War : इस्राइल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट, गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर पोलीस सतर्क

मात्र त्यानंतरही ड्रायव्हरचे सतत कॉल आणि मेसेज सुरूच ठेवले. ड्रायव्हरने हद्द पार करत महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडीओही पाठवले. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ड्रायव्हरविरोधात कलम ३५४ आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com