Israel-Hamas War : इस्राइल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट, गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर पोलीस सतर्क

Alert in Delhi on Israel-Hamas War : गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीसह अनेक शहरांसाठी अलर्ट जारी केला आहे.
Israel-Palestine War
Israel-Palestine WarSaam TV
Published On

New Delhi News :

इस्रायल आणि हमासमध्ये मागील ७ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा संपूर्ण जगावर काही प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. इस्राइल-हमास यांच्यातील युद्धामुळे नवी दिल्लीतही तणाव वाढला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीसह अनेक शहरांसाठी अलर्ट जारी केला आहे.

गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे की, आज देशाच्या राजधानीसह अनेक शहरांमध्ये निदर्शनांच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. या माहितीनंतर दिल्ली पोलीस आता सतर्क झाले आहेत. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.  (Latest Marathi News)

गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर, दिल्लीत सर्व ठिकाणी शुक्रवारच्या नमाजच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे. माहितीनुसार, दिल्लीसह इतर काही शहरांमध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दिल्ली पोलिसांनी इस्त्रायली दूतावासासह ज्यू धार्मिक स्थळांशी संबंधित सर्व ठिकाणची सुरक्षा वाढवली आहे.

Israel-Palestine War
Operation Ajay: सुटकेचा निःश्वास! इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले; मोदी सरकारचं 'ऑपरेशन अजय' सुरू

इस्राइलमध्ये १२००हून अधिक नागरिकांचा मृत्यू

इस्राइल-हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. इस्राइलच्या लष्कराच्या माहितीनुसार, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 1200 हून अधिक इस्रायली नागरिक मारले गेले आहेत.

तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 95 हून अधिक कुटुंबातील सदस्यांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे.

हमासने आतापर्यंत इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅलेस्टाईनमध्येही 900 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि सुमारे 4 हजार लोक जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com