Latur Crime Saam tv
क्राईम

Crime: ५० रूपयांच्या उधारीसाठी चाकूने सपासप वार, ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Latur Crime News: लातूरमध्ये ५० रुपयांच्या उधारीसाठी तरुणाची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Priya More

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये ५० रुपयांसाठी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. लातूर शहरातल्या म्हाडा कॉलनी येथे ही घटना घडली. पान टपरी चालकाने उधारीचे पैसे मागितले त्यावरून भयंकर वाद झाला. या वादातून पान टपरी चालकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तर या चाकू हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोघांविरोधात लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ५० रुपयांची उधारी मागितली म्हणून लातूरमध्ये एकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. लातूर शहरातल्या म्हाडा कॉलनी येथे पान टपरी चालकाने उधारी मागितली यावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि या वादातून टपरी चालक गणेश सूर्यवंशी (वय ३८ वर्षे) याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आरोपी शहजाद शेख, आणि अब्बास शेख यांच्याविरोधात लातूरच्या विवेकानंद पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पानटपरी चालकाच्या हत्येची ही घटना सोमवारी रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून राजू दासराव साळुंके (वय ३५ रा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातूर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. लातूरमधील म्हाडा कॉलनीत रस्त्यालगत गणेश सूर्यवंशीची पानटपरी आहे. याच परिसरामध्ये राहणाऱ्या एकाकडे पानटपरीची ५० रुपयांची उधारी होती. उधारीवरुन शेख अब्बास आणि शेख शहजाद (दोघेही रा. म्हाडा कॉलनी) यांनी देवीदास गायकवाड यांचा मुलगा बालाजी याच्या टपरीवर वाद घातला होता आणि धमकी दिली.

पोलिसांनी पुढे सांगितले की, 'याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाईकावर दोघांनी धारदार शस्त्राने, सुरा, कोयत्याने हल्ला केला. यात गणेश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर आहे. उधारीवरून आरोपी आणि पान टपरी चालकात वाद झाला. नातेवाईकांसोबत गेलेल्या गणेश सूर्यवंशीला मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.' दरम्यान, जानेवारी ते मे २०२५ या ५ महिन्यात क्षुल्लक कारणावरुन लातूर जिल्ह्यात १५ खुनाच्या घटना घडल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravivar Upay: कुटुंबातील व्यक्तींचं आरोग्य राहील एकदम ठणठणीत; रविवारच्या दिवशी करा फक्त हे उपाय

Plane Fire: उड्डाण घेताच विमानाला भीषण आग, आकाशात घिरट्या घातल्या त्यानंतर...; प्रवासी प्रचंड घाबरले; पाहा VIDEO

Viral Video : धावत्या बाईकच्या टाकीवर बसून कपलचा रोमान्स; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही वाटली लाज

Maharashtra Live News Update: नाशिक- मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Achara Beach : पांढरी शुभ्र वाळू अन् खळखळणाऱ्या लाटा, आचरा बीचचं सौंदर्य तुमच्या मनाला भुरळ पाडेल

SCROLL FOR NEXT