Chandrapur Crime Saam Tv
क्राईम

Crime: उधारीवर सिगारेट दिली नाही, तरुणाची सटकली; धारधार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

Chandrapur Crime: चंद्रपूरमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. सिगारेट न दिल्याच्या रागातून एका १७ वर्षीय मुलाने महिलेची कोयत्याने वार करत हत्या केली. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Priya More

संजय तुमराम, चंद्रपूर

उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरामध्ये ही घटना घडली. १७ वर्षांच्या मुलाने रागाच्या भरात महिलेची हत्या केली. या प्रकरणी या मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरामध्ये राहणाऱ्या महिलेची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे १५ जूनला ही हत्याकांडाची घटना घडली. कविता रायपूरे या ५५ वर्षीय महिलेची घरी एकटी असताना धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन मुलगा याच परिसरातील रहिवासी आहे. या मुलाने उधारीवर सिगारेट मागितली. कविता यांनी सिगारेट दिली नाही. याचा राग आल्याने त्याने कविता यांची हत्या केली.

रागाच्या भरात त्याने कविता यांच्यावर धारधार शस्त्राने वार करत संपवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. मयत कविता रायपुरे यांच्या घरीच छोटे किराणाचे दुकान आहे. आरोपीची जवळपास एक हजार रुपये उधारी असल्याने कविता यांनी आधीची उधारी दिल्याशिवाय सिगरेट देणार नाही असे सांगितले.

त्यामुळे आरोपीने पहाटेच्या सुमारास कोयत्याने डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीविरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

'पंचविशीत २-३ बीएचके फ्लॅट अन्... मुलीच्या कुटुंबाकडून भरमसाठ अपेक्षा चुकीचं', मराठी अभिनेत्रीचं लग्नाबाबत परखड मत

Shilpa Shetty: 420! अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल, प्रॉपर्टी होणार जप्त

Maharashtra Live News Update: शिवसेना शिंदे गट व भाजपाची धाकधुक वाढली

मुंबईकरांचा खोळंबा! भुयारी मेट्रो कोलमडली; सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांचे हाल|VIDEO

SCROLL FOR NEXT