Delhi Crime Saam Tv
क्राईम

Crime: तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली, आधी आई-वडील अन् भावाची हत्या, नंतर मेट्रो स्टेशनवर गेला अन्...

Delhi Crime: दिल्लीमध्ये एका तरुणाने आपल्या आई-वडील आणि भावाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेने दिल्ली हादरली.

Priya More

दिल्लीमध्ये तरुणाने आई-वडील आणि भावाची हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिल्लीच्या मैदान गढी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. हा तरुण एम्स मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. पण मेट्रो स्टेशनवरील सुरक्षा दलाने या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केला. या तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी आरोपी सिद्धार्थ एम्स मेट्रो स्टेशनवर आला. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता त्याने आई-वडील आणि भावाची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाच्या घरी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांना प्रेम सिंह (४५ वर्षे) आणि ऋतिक (२४ वर्षे) यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दिसला. तर पहिल्या माळ्यावर आरोपीची आई रजनी (४० वर्षे) यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे देखील गोळा केले.

पोलिस तपासातून समोर आले की, सिद्धार्थ गेल्या १२ वर्षांपासून अनेक मानसिक आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या खोलीतून औषधे आणि वैद्यकीय नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याला मानसिक त्रास असल्यामुळे त्याचा स्वभाव तापट झाला होता आणि कुटुंबीयांसोबत त्याचे सतत भांडण होत होते. वडिलांच्या सततच्या दारूच्या व्यसनामुळे सिद्धार्थच्या घरात सतत भांडणे होत होते. रागाच्या भरात त्याने कुटुंबीयांची हत्या केली. तर, सद्धार्थ अनेक वेळा घर सोडून गेला होता, अशी माहिती शेजारच्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT