Crime News : पुणे हादरलं! तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूडाचा थरार

Pune News : पुण्यातील मांगडेवाडी परिसरात संगणक अभियंता सौरभ आठवले याचा मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातुन सूड घेण्यासाठी निर्घृण हत्या करण्यात आली.
Crime News : पुणे हादरलं! तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूडाचा थरार
Pune News Saam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील मांगडेवाडी परिसरात संगणक अभियंता सौरभ आठवलेचा निर्घृण खून

  • मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी आरोपींनी रचला कट

  • चौघा आरोपींनी मिळून दुर्गम डोंगरावर नेऊन धारदार शस्त्रांनी हत्या केली

  • राजगड पोलिसांकडून आरोपी ताब्यात, २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील मांगडेवाडी परिसरात घडलेली एक थरकाप उडवणारी घटना समोर आली असून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी एका तरुण अभियंत्याचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या खूनामुळे संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

सौरभच्या हत्येमागचं कारण काय ?

पीडित तरुणाचे नाव सौरभ स्वामी आठवले (वय २५) असून तो संगणक अभियंता होता. सौरभ हा आपल्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीला बहीण मानत होता. तिच्या आयुष्याची काळजी घेणारा, तिला योग्य मार्गावर ठेवणारा सौरभ याला त्या मुलीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. हे प्रेमसंबंध तीने तिच्या घरच्यांपासून लपवले होते. सौरभने बहिणीची जबाबदारी म्हणून तिच्या घरच्यांना हे सत्य सांगितले.परंतु या सत्याचा परिणाम वेगळाच झाला.यामुळे तिच्या अल्पवयीन प्रियकरच्या डोक्यात तिडीक गेली. आणि संतापाने माझं नातं उघडं केलं याची किंमत तुला चुकवावीच लागेल अशी धमकी दिलीं.

Crime News : पुणे हादरलं! तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूडाचा थरार
Shocking : सिंहगडावर फिरायला आलेला तरुण बेपत्ता; २४ तास उलटूनही शोध लागला नाही

कशी करण्यात आली सौरभची हत्या?

१८ ऑगस्टच्या रात्री सौरभ आपल्या घरातून बाहेर पडला.त्यानंतर तो परतलाच नाही.दुसऱ्या दिवशी घरच्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, राजगड पोलिसांना शिंदेवाडी गावच्या डोंगरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. सौरभचा मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

Crime News : पुणे हादरलं! तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूडाचा थरार
Pune : पुणे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ही 'दोन' गणेश मंडळ प्रथेनुसार विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार?

पोलिसांनी काय कारवाई केली ?

हत्येचा मागोवा घेत पोलिसांना उलगडा झाला की अल्पवयीन प्रियकराने सूडातून हत्येचाचा कट रचला होता. त्याने आपल्या तीन मित्रांना श्रीमंत अनिल गुज्जे (२१,वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (१९., वडगाव मावळ) आणि नितीन त्र्यंबक शिंदे (१८ वर्षे ५ महिने,कात्रज, पुणे, मूळ रा. लातूर) यांना सोबत घेतले. या चौघांनी मिळून सौरभला घराखाली बोलावले,जबरदस्तीने गाडीवर बसवले आणि दुर्गम डोंगरावर नेले. तिथे निर्घृणपणे धारदार हत्यारांनी सौरभवर हल्ला चढवून त्याला जीवे मारले.

Crime News : पुणे हादरलं! तरुण अभियंत्याचा निर्घृण खून, मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून सूडाचा थरार
Pune: पुण्यात फिरण्यासाठी आला, मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर गेला; तानाजी कड्यावरून दरीत पडून तरुण बेपत्ता

या हत्येप्रकरणी राजगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले ॲक्टिव्हा, स्प्लेंडर मोटरसायकल, मोबाईल फोन व हत्यारे जप्त करण्यात आली. तसेच भोर न्यायालयाने आरोपींना २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास राजगड पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com